सध्या लोकसभेची निवडणुकीचे धामधूम अख्या देशात सुरू असून त्यानंतर येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक देखील होणार आहे. आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदारांची व विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमदारांची निवड केली जाते.
परंतु याप्रसंगी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असेल की आमदार आणि खासदारांना किती पगार मिळत असेल किंवा त्यांना कोणते भत्ते किंवा सुविधा मिळत असतील. तसेच पगार आमदारांना जास्त मिळतो की खासदारांना? असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतात. याच प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात या लेखात बघू.
आमदार व खासदारांना किती मिळते पगार व भत्ते?
विधानसभेचे आमदारांच्या दृष्टिकोनातून बघितले तर लोकसभेच्या खासदारांपेक्षा त्यांना अधिकचा पगार व भत्ते मिळतात. तसेच आमदारांचे कार्यक्षेत्र पाहिले तर ते मोठे शहरी मतदार संघाचा अपवाद वगळता सुमारे 300 गावे त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. परंतु त्या तुलनेमध्ये मात्र खासदारांच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ एक हजार आठशे गावे येतात.
परंतु जर पगार व भत्त्यांची आकडेवारी पाहिली तर आमदारांना खासदारांपेक्षा जास्त पगार व भत्ते मिळतात. तुलनात्मक दृष्ट्या बघितले तर दोघांना एक लाख रुपये पगार आहे आणि त्यासोबत मिळणारे विविध भत्ते 88 हजार रुपयांपर्यंत मिळतात. म्हणजेच पगार व भत्ते असे मिळून जर पाहिले तर आमदार व खासदारांना प्रत्येकी एक लाख 88 हजार रुपये मिळतात.
2018 पर्यंत खासदारांना 50 हजार रुपये पगार मिळायचा व त्यात आता वाढ केली गेली असून तो आता एक लाख रुपये इतका मिळतो. 2018 पर्यंत खासदारांना विमान प्रवासाच्या तिकिटाची जी काही रक्कम असेल त्यात 25% रक्कम प्रवास भत्ता म्हणून मिळत होती. परंतु आता 2018 मध्ये पगार वाढ दिली पण हा भत्ता खासदारांचा बंद करण्यात आला आहे.
आमदार व खासदारांना कोणत्या सवलती मिळतात?
प्रत्येक खासदार व आमदार यांना पीए सोबत ठेवावा लागतो व खासदारांच्या पीएचा पगार 40000 रुपये दिला जातो. आमदाराच्या पीएला सत्तावीस हजार पाचशे रुपये इतका पगार मिळतो. याशिवाय दोघांना रेल्वेचा प्रवास मोफत असून विमान प्रवासाचे 32 मोफत पास आमदारांना दरवर्षी मिळतात.
म्हणजेच आमदार हे 32 वेळा एका वर्षात विमानाने फुकट प्रवास करू शकता. आमदारांच्या तुलनेत खासदारांचा विचार केला तर त्यांना 34 वेळा विमान प्रवास मोफत आहे. याशिवाय त्यांना सरकारच्या माध्यमातून दिल्लीत घर दिले जाते. परंतु त्यात पुरवलेल्या सोपा व इतर फर्निचरचे पैसे मात्र खासदारांना द्यावे लागतात.
आमदार व खासदारांना किती विकास निधी मिळतो?
मतदारसंघासाठी मिळणाऱ्या विकास निधी पाहिला तर आमदारांना एका वर्षाला पाच कोटी रुपये तीनशे गावांसाठी मिळतात. या हिशोबाने पाहिले तर खासदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील 1800 गावांमध्ये 30 कोटी रुपयांचा निधी प्रत्येक वर्षाला मिळाला पाहिजे. परंतु तो तीस कोटी ऐवजी फक्त पाच कोटी रुपये मिळतो.
म्हणजे पाच वर्षात 1800 गावाकरिता 25 कोटी रुपयांच्या निधीवर खासदारांना समाधान मानून घ्यावे लागते. म्हणजेच कार्यक्षेत्र खासदारांचे जास्त असताना देखील विकास निधी मात्र सारखाच मिळतो.
मुंबईत राहण्यासाठी आमदारांना मिळतात अतिरिक्त पैसे
मुंबईमध्ये आमदारांसाठी मनोरा आमदार निवासाची सुविधा उभारण्यात आलेली असून त्याची आता पुनर्बांधणी देखील सुरू आहे. यामध्ये ज्या आमदारांना आमदार निवासामध्ये एक खोली आहे त्यांना 35 हजार रुपये तर ज्यांना एकही खोली नाही त्यांना 70 हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात. ही जी काही रक्कम आहे ती इतर पगार व भत्त्यांव्यतिरिक्त आहे. ही रक्कम जर गृहीत धरली तर आमदारांना खासदारांपेक्षा अधिक पगार आहे.