Lok Sabha Election 2024: आचारसंहिता म्हणजे नेमके काय असते? काय असतात नियम? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
lok sabha election

Lok Sabha Election 2024:- काल देशातील निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला व त्यानुसार देशामध्ये सात टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडणार असून त्यामध्ये काही राज्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील निवडणूक आयोगाने जाहीर केला.

गेल्या काही दिवसांपासून देशांमध्ये निवडणुकांचे वातावरण गरम झाले असून विविध राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर तयारी चालवलेली आहे. देशातील भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांनी देखील

या लोकसभा निवडणुकांची तयारी केली आहे. सत्ताधारी भाजपाने यावेळी 400 पार चा नारा दिला असून त्या दृष्टिकोनातून भाजपा कडून जोरदार तयारी करण्यात येत आहे तर देशातील बऱ्याच ठिकाणी  भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेल्या इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे.

परंतु या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिले तर काल जेव्हा निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या अगदी त्याच वेळेपासून देशामध्ये आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमध्ये सरकारसाठी अनेक प्रकारचे नियम ज्या प्रकारे असतात तसेच नियम हे राजकीय पक्षांसाठी देखील प्रचारा संदर्भात लागू केलेले असतात.

निवडणुकीची प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने व व्यवस्थित पार पाडावी याकरिता निवडणूक आयोग पोलिसांची तसेच काही ठिकाणी लष्कराची देखील मदत घेत असते. तसेच या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राजकीय पक्षांना प्रचारासाठी देखील काही नियमावली निश्चित केलेली असते.

त्यामुळे या लेखात आपण प्रचारासाठी नेमके कोणते नियम राजकीय पक्षांना लागू केलेले असतात? याबाबतची माहिती घेणार आहोत.

 प्रचारासाठी कोणते नियम असतात?

1- या कालावधी दरम्यान कोणताही उमेदवाराला किंवा पक्षाला समाजामध्ये धार्मिक किंवा भाषीय, वेगवेगळ्या जाती समुदायांमध्ये मतभेद वाढेल किंवा परस्परांविषयी द्वेष किंवा तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे कोणतीही कृती करण्यावर बंधन घातलेले असते. तसेच कोणत्याही स्वरूपामध्ये चिथावणीखोर भाषेचा वापर करता येत नाही.

2- जेव्हा राजकीय पक्षांवर टीका केली जाते तेव्हा त्या पक्षांची धोरण आणि कार्यक्रम, त्यांच्या गेल्या काळातील किंवा भूतकाळातील कामे किंवा नोंदी यापर्यंत ती टीका मर्यादित असते.

राजकीय पक्ष आणि पक्षांच्या उमेदवारांनी इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या वैयक्तिक जीवनातील पैलूंवर टीका करणे टाळावे. त्यासोबतच वैयक्तिक पैलूंच्या आधारे इतर पक्षांवर किंवा त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे टाळावे.

3- मत मिळावे याकरिता जातीय किंवा सांप्रदायिक भावनांचा आधार कुठल्याही परिस्थितीत घेतला जाऊ नये व त्या आधारे कोणतेही आवाहन केले जाणार नाही. महत्वाचे म्हणजे मशिदी, मंदिर तसेच चर्च व इतर प्रार्थना स्थळे निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापरली जाणार नाहीत.

4- तसेच पक्षांनी आणि उमेदवारांनी निवडणूक कायद्यानुसार ज्या काही भ्रष्ट पद्धती आहेत आणि यामध्ये ज्या गुन्ह्यांचा समावेश आहे अशा सर्व गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. तसेच मतदारांना कुठल्याही प्रकारची लाच देऊ नये किंवा धमकाऊ नये व आमिष दाखवू नये.

5- महत्वाचे म्हणजे मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या अंतरावर प्रचार करू नये व मतदानाच्या तारखे आधी निश्चित केलेल्या जो काही  48 तासांचा कालावधी असतो त्यामध्ये प्रचार करू नये. प्रतिबंधित काळामध्ये जाहीर सभा घेऊ नये किंवा मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत  आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करू नये.

6- तसेच कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार कोणत्याही व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय त्याचे घर किंवा मालमत्तेवर झेंडा किंवा बॅनर लावणार नाही किंवा नोटीस देखील चिकटवून शकणार नाही.

7- इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा किंवा मिरवणुकांमध्ये इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांनी अडथळा निर्माण होणार नाही किंवा व्यत्यय आणला जाणार नाही याची काळजी घेणे देखील गरजेचे असते.

8- एखाद्या पक्षाकडून सभा आयोजित केली गेली असेल तर त्या सोबत दुसऱ्या पक्षाला मिरवणूक काढता येणार नाही. एका राजकीय पक्षांनी पोस्टर किंवा बॅनर लावले असतील तर दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते ते काढणार नाहीत.

 आचारसंहिता म्हणजे नेमके काय?

देशामध्ये निष्पक्ष आणि स्वतंत्र पद्धतीने निवडणुका पार पाडाव्यात याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही नियम घालून दिलेली असतात व त्या नियमावलीलाच आचारसंहिता म्हटले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या नियमांचे पालन करणे सरकार तसेच राजकीय पक्ष व पक्षांच्या नेत्यांवर बंधनकारक असते.

केंद्र व राज्यातील सत्तारूढ पक्ष आणि प्रत्येक उमेदवाराने या आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे असून त्याची निवडणूक आयोग घटनेच्या कलम 324 अन्वये खबरदारी घेते.

निवडणुका जाहीर झाल्या की त्या क्षणापासून सरकारी कर्मचारी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात. आचार संहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू करण्यात आलेली व्यवस्था असते  व ती सगळ्यांनी पाळणे खूप गरजेचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe