सुजय विखेंवर एकही गुन्हा नाही! ना एकही वाहन! अशी आहे सुजय विखेंची संपत्ती

Ajay Patil
Published:
dr.sujay vikhe

सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुक 2024 ची रणधुमाळी सुरू असून एक प्रकारे संपूर्ण देशात लोकसभा या निवडणुकीचा फीवर चढला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोकसभेची ही निवडणूक सात टप्प्यात पार पडणार असून यातील पहिला टप्प्यातील मतदान झाले आहे व दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आता सुरू आहे. महाराष्ट्रमध्ये देखील ही लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर महाराष्ट्रामध्ये आज पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांपेक्षा ही लोकसभा निवडणूक खूप रंगतदार होईल अशी शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे या लोकसभा निवडणुकी मधील चुरस आणखीनच वाढताना दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढत होणार आहेत त्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत ही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरद पवार गट ) यांच्याकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात असलेले अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्या अर्जामध्ये त्यांनी मालमत्तेच्या विवरण पत्रामध्ये त्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेचे स्वरूप जाहीर केले आहे व त्यानुसार त्यांच्याकडे असलेली संपत्ती आपण या लेखात बघणार आहोत.

 अशी आहे डॉ.सुजय विखेंची संपत्ती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून सन 2019 च्या तुलनेत त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेत सुमारे 11 कोटी 93 लाख 84 हजार 39 रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. काल डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवारांचे मालमत्तेचे विवरण देण्यात आले असून या  मालमत्तेच्या विवरण पत्रावरून दिसून येत आहे की 2019 मध्ये अर्ज दाखल करताना दिलेले मालमत्तेचे विवरण व आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील अर्ज भरताना दिलेले मालमत्तेचे विवरण यातील आकडेवारी जर तुलनात्मक दृष्ट्या बघितली तर यामध्ये खूप मोठे बदल झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिली तर डॉ. सुजय विखे यांची जंगम मालमत्ता 4 कोटी 91 लाख 73 हजार 996 रुपये तर स्थावर मालमत्ता 6 कोटी 25 लाख 79 हजार 443 रुपये होती. त्या तुलनेत जर आपण 2024 मधील विवरण पत्राचा आधार घेऊन तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर डॉ. सुजय विखे यांच्या जंगम मालमत्तेत सहा कोटी तीन लाख 93 हजार 897 तर स्थावर मालमत्तेमध्ये पाच कोटी 89 लाख 90 हजार 142 रुपयांनी वाढ झाली असून एकूण संपत्ती आता अकरा कोटी 93 लाख 84 हजार वर पोहोचली आहे.

डॉ.विखे दाम्पत्याकडे एकही गाडी नाही

वाहनांच्या बाबतीत पाहिले तर 2019 मध्ये डॉ सुजय विखे यांच्याकडे एकही वाहनाची नोंद नव्हती. मात्र त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्याकडे मात्र 66 लाख 88 हजार 766 रुपयांची वाहने होती. परंतु आता 2024 मध्ये या दांम्पत्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेले आहे.

डॉ. विखे दांपत्याकडे किती आहेत दागिने?

डॉ.सुजय विखे यांच्याकडे 2024 मध्ये 541.120 ग्रॅम म्हणजेच 35 लाख 33 हजार 513 रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत तर त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्याकडे 690.674 ग्रॅम म्हणजेच 45 लाख दहा हजार एकशे एक रुपये किमतीचे दागिने आहेत. दोघे मिळून या दागिन्यांची एकूण किंमत 80 लाख 43 हजार 614 रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe