Electronic Voting Machine: ईव्हीएमचे काम कसे चालते? कशी पार पाडली जाते मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया? जाणून घ्या माहिती

Ajay Patil
Published:
EVM

Electronic Voting Machine:- सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेचे वातावरण गरम झाले असून देशामध्ये सात टप्प्यात ही लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष व त्यासोबत प्रत्येक राज्यात असलेली प्रादेशिक पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीच्या तयारीला लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपल्याला दिसून येत आहेत.

यामध्ये विरोधक अनेक प्रकारचे आरोप सत्ताधाऱ्यांवर करतात आणि सत्ताधारी देखील विरोधकांवर आरोप करत असतात. परंतु या सगळ्या आरोपांच्या धामधुमीत मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमच्या विश्वासहार्तेवर बऱ्याच दिवसापासून विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे देशामध्ये बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घेण्यात याव्यात असा देखील  सूर विरोधी पक्षांकडून आळवला जात आहे. या सगळ्या ईव्हीएम च्या भानगडीत मात्र  सर्वसामान्य मतदाराला बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की नेमके हे ईव्हीएम मशीन कसे आहे व याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया व मतमोजणी कशी पार पडते? ईव्हीएम मशीनची गरज का भासली? असादेखील प्रश्न आपल्यापैकी कित्येक जणांच्या मनामध्ये आला असेल. त्यामुळे या लेखात आपण यासंबंधीची माहिती बघू.

 ईव्हीएम मशीनमध्ये किती मते रजिस्टर होतात आणि ते कसे काम करते?

साधारणपणे जर आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम मशीनच्या  अनुषंगाने बघितले तर एका मशीनमध्ये जास्तीत जास्त 3840 नोंदली जाऊ शकतात. कारण एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1500 पेक्षा कमी मतदारांची संख्या असते. त्यामुळे ईव्हीएम मशीन फायद्याचे ठरतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे ईव्हीएम मध्ये जर उमेदवारांची संख्या 64 पर्यंत असेल तर ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेता येणे शक्य आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 64 पेक्षा जास्त उमेदवार असतील तर ईव्हीएम च्या माध्यमातून निवडणूक न घेता ती मतपत्रिका व मतपेट्यांच्या पद्धतीनुसार घेतल्या जातात. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हे विद्युत पुरवठ्यावर न चालता ते बॅटरीवर चालते. त्याकरिता ईव्हीएम मशीनमध्ये अल्कलाइन बॅटरी दिलेल्या असतात.

 मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम आणण्याची गरज का पडली?

बऱ्याच जणांना माहिती असेल की अगोदर मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडत असे. परंतु यामध्ये मात्र मतमोजणी करण्यासाठी खूप मोठा कालावधी लागत असायचा. समजा एखाद्या वेळेस दोन दिग्गज उमेदवार आहेत व निवडणुकीमध्ये  मतमोजणी दरम्यान जर त्यांच्या मतांमध्ये कमी फरक दिसून आला

तर फेर मतमोजणी करण्याच्या मागणीमुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट होत असे. त्यामुळे मतपत्रिके ऐवजी ईव्हीएमच्या वापर करावा ही संकल्पना पुढे आली. आपला भारतामध्ये ईव्हीएमची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून केली जाते.

 भारता व्यतिरिक्त जगातील कोणत्या देशांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो?

जर आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम मशीनचा विचार केला तर जगामध्ये नेपाळ व भूतानमध्ये ईव्हीएम मशीन चा वापर निवडणुकीत केला जातो. भारतामध्ये 1982 रोजी केरळ राज्यातील परुर विधानसभा मतदारसंघात 50 जागांवर मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला गेला होता व हा वापर भारतातील ईव्हीएम मशीनचा पहिला वापर ठरला.

 मतदानानंतर ईव्हीएम सीलबंद कसे केले जातात?

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम संपूर्णपणे एका वेस्टनामध्ये गुंडाळले जाते. यामुळे कुणाला बटनाला हात लावता येणार नाही त्यामागचा उद्देश असतो. मशीन सोबतच त्यावर असणाऱ्या रिझल्ट विभागाला म्हणजेच रिझल्ट सेक्शनला देखील सीलबंद केले जाते. केलेल्या सीलबंदवर मतदाना अधिकाऱ्यांबरोबरच उमेदवार व त्याच्या प्रतिनिधींची सही घेतली जाते व मतमोजणी आधी कोणालाही निकाल यामुळे कळत नाही.

 निकालापर्यंत ईव्हीएम मशीन कुठे ठेवली जातात?

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात. यामध्ये जवळपासच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत देखरेख ठेवू शकतो. साधारणपणे ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणीच ठेवली जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe