Lok Sabha Election Result 2024:- काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. परंतु या निवडणुकीमध्ये भाजपाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागांवर विजय मिळवता आला. चारशे पारचा नारा देणाऱ्या एनडीए आघाडीला केवळ 292 जागांवर समाधान मानावे लागले तर भाजपाला 249 जागांवर विजय मिळवता आला.
मात्र त्या तुलनेत इंडिया आघाडीने मात्र जोरदार मुसंडी घेत 232 जागांवर विजय मिळवून काँग्रेसने देखील 99 जागा जिंकल्या. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर 2019 च्या तुलनेमध्ये यावर्षी देखील मोदी वाराणसीतून फार कमी मतांच्या फरकाने विजयी झाले.
2019 च्या निवडणुकीमध्ये 4.79 लाखांच्या मतांनी विजयी होणारे नरेंद्र मोदी यावर्षी अवघ्या 1.52 लाखांच्या फरकाने विजयी झाले.या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण या लोकसभा निवडणुकीत कोणाचा सर्वाधिक मतांनी विजयी झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर काही आकडे खूप आश्चर्यकारक असे आहे.
लोकसभा निकालामध्ये हे उमेदवार झाले सर्वाधिक फरकाने विजयी
1- शंकर लालवानी– इंदूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीला उभे राहिलेले शंकर लालवानी यांनी तब्बल 12 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवून एक प्रकारचा इतिहासच रचला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश मध्ये नोटा हा उपविजेता ठरला असून नोटाला दोन लाख 18 हजार 674 इतके मते मिळाली.
2- शिवराज सिंह चौहान– मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजपाच्या तिकिटावर विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढवत तब्बल आठ लाखापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या प्रताप भानु शर्मा यांचा पराभव केला व शर्मा यांना अवघी दोन लाख 95 हजार 52 मते मिळाली.
3- गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील– गुजरात भाजपाचे अध्यक्ष असलेले सी आर पाटील यांना नवसारी मधून दहा लाख 31 हजार 65 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नौशाद भूपतभाई देसाई यांचा तब्बल 7.7 लाख मतांच्या फरकाने पराभव केला.
4- ब्रुजमोहन अग्रवाल– छत्तीसगड राज्यातील रायपूर मधून भाजपाचे ब्रूज मोहन अग्रवाल यांना दहा लाख 50 हजार 351 मते मिळाली व त्यांनी त्यांचे विरोधक काँग्रेसचे विकास उपाध्याय यांना चार लाख 75 हजार 66 मते मिळाली.
5- राजपाल सिंह महेंद्रसिंह जाधव– गुजरात राज्यातील पंचमहाल लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राजपाल सिंह महेंद्रसिंह जाधव यांनी काँग्रेसचे गुलाब सिंह चौहान तुमच्या विरुद्ध पाच लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला.
6- ज्योतिरादित्य शिंदे– मध्यप्रदेश राज्यातील गुना मतदारसंघातून भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे यादवेंद्रराव देशराज सिंह यांच्या विरोधात पाच लाख 40 हजार 929 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
इंडिया आघाडीतील सर्वाधिक मतांनी विजयी झालेले उमेदवार
1- रकिबूल हुसेन– आसाम मधील धुबरी लोकसभा मतदारसंघात दहा लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवीत काँग्रेसचे रतीबुल हुसेन यांनी इतिहास रचला आहे. त्यांना तब्बल 14 लाख 71 हजार 885 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे बद्रुद्दिन अजमल यांना साडेचार लाख मते मिळाली.
2- शशिकांत सेंथील– तामिळनाडूतील तिरुवल्लूर मतदारसंघावर काँग्रेसचे शशिकांत सेंथिल यांनी भाजपाच्या पोन बालगणपतीविरुद्ध पाच लाख 72 हजार 155 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
3- राहुल गांधी– राहुल गांधींनी देखील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायबरेली मतदारसंघ तब्बल तीन लाख 90 हजार 30 मतांच्या फरकाने जिंकला असून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे दिनेश प्रताप सिंह यांना दोन लाख 97,619 मते मिळाली.