महाविकास आघाडीच ठरलं ! उबाठा शिवसेनेच्या संभाव्य 16 उमेदवारांची यादी समोर, शिर्डीत कोणाच्या हाती मशाल ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस झाले आहेत.

तरीदेखील महायुती मधील मित्र पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फिक्स झालेला नाही. जागा वाटपावरून सध्या दोन्ही गटात ‘बैठक पे बैठक’ असे सत्र सुरू आहे.

मात्र, दोन्ही गटांमध्ये काही जागांवर सहमती झाल्याचे पाहायला मिळतेय. हेच कारण आहे की उद्या अर्थातच 26 मार्चला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार अशी शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांनीच हे संकेत दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उबाठा शिवसेना पक्षाच्या या पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. या संभाव्य उमेदवारांची यादी देखील प्रसारमाध्यमांमध्ये झळकु लागली आहे.

अशा परिस्थितीत आज आपण उबाठा शिवसेना पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार नेमके कोण आहेत, कोणत्या संभाव्य जागा उबाठा शिवसेनेला दिल्या जाणार आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार या संभाव्य यादीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे देखील नाव आहे. या जागेवरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली जाऊ शकते असा दावा होत आहे. 

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ 

  1. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
  2. उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
  3. उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
  4. दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
  5. रायगड – आनंद गीते
  6. रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  7. ठाणे – राजन विचारे
  8. धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  9. परभणी – संजय जाधव
  10. सांगली – चंद्रहार पाटील
  11. मावळ – संजोग वाघेरे
  12. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
  13. बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  14. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
  15. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  16. यवतमाळ वाशिम – संजय देशमुख

वर दिलेली यादी ही उबाठा शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची आहे. ही पक्षाने जारी केलेली अधिकृत यादी नाही. यामुळे यांनाच उमेदवारी मिळते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.

तथापि उद्या सामनामधून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे यापैकी कोणाला संधी मिळते किंवा यातून कोणाचा पत्ता कट होतो याच्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.