नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार…. शिंदे गटातील ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Uddhav Thackeray And Narendra Modi : भारतात लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. 16 जून 2024 ला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे निवडणूक आयोग लवकरच लोकसभेच्या तारखा आता जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चालू आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

राजकीय नेते आता प्रचारसभेत गुंग आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपा आपल्या उर्वरित उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर करणार आहे. इतर पक्ष सुद्धा लवकरच आपली उमेदवार अंतिम करून याची यादी जाहीर करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच महाराष्ट्रात दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

अशा या राजकीय घडामोडीत पुन्हा एकदा उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येणार असे संकेत मिळू लागले आहेत. भाजपा आणि उबाठा शिवसेना पुन्हा एकत्र येणार या चर्चा ऐन लोकसभेपूर्वीच सुरू झाल्या आहेत.या चर्चा सुरू होण्याचे कारण असे की शिंदे गटाच्या एका आमदाराने खळबळजनक वक्तव्य केल आहे.

शिंदे गटाच्या आमदाराने 100% नव्हे तर 1000% खात्रीने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार असा दावा केला आहे. त्यामुळे सध्या या आमदाराचे वक्तव्य राज्याच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेत आले असून यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार का ? असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे पुन्हा एकत्र येणार ?

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एकत्र येणार असा दावा शिंदे गटाच्या एक आमदाराने केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी हा दावा केला आहे. त्यांनी छातीठोकपणे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार असे म्हटले आहे. त्यामुळे सध्या शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

काय म्हटलेत बापू ?

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र येणार असे म्हटले आहे. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे असल्याचे कारण यावेळी दिले आहे.

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील यांनी म्हटले की, हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागणार, तो दिवस लवकरच येणारच आहे. राम मंदिर बांधल्यापासून सर्वत्र एक वेगळं वातावरण आहे.

अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात गैर काही नसल्याचे म्हटले आहे. तसेच शहाजी बापू पाटील यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असा दावा सुद्धा केला आहे. यामुळे सध्या उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार का ? याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.