Lok Sabha Election 2024 : ‘या’ 14 गावातील मतदार बजावतील दोन राज्यांमध्ये मतदानाचा हक्क, पण का? वाचा या गावांची इंटरेस्टिंग माहिती

Ajay Patil
Published:
Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024:- सध्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून संपूर्ण देशामध्ये आता प्रचाराने वेग घेतला आहे व प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत.

त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामा तसेच काही योजनांच्या घोषणा देखील करण्यात येत आहेत. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देखील अनेक सामाजिक संस्था व इतर संस्थांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

परंतु या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जर आपण भारतातील 14 गावांच्या अनुषंगाने बघितलं तर या ठिकाणचे मतदार हे या लोकसभा निवडणुकीमध्ये दोनदा मतदान करू शकणार आहेत. ही 14 गावे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर असून या ठिकाणी एकूण 14 गाव मिळून चार हजार मतदार आहेत.

या गावचे हे चार हजार मतदार महाराष्ट्रात चंद्रपूर मतदारसंघासाठी 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यात मतदान करतील व तेलंगानातील आदीलाबाद मतदारसंघासाठी 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्याकरिता मतदान करतील. विशेष म्हणजे या चौदा गावातील मतदारांना दोन्ही राज्यांमध्ये मतदान करण्याचा विशेष अधिकार आहे.

14 गावातील नागरिकांकडे आहे दोन ओळखपत्र व दोन रेशनकार्ड

या व्यतिरिक्त या गावांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावांच्या नागरिकाकडे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील दोन रेशन कार्ड, दोन आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे आहेत. त्यामुळे या गावच्या नागरिकांना दोनही राज्यातील ज्या काही योजना आहेत त्यांचा फायदा घेता येतो.

दोन्ही राज्यांमध्ये असलेला सीमा विवाद आहे कारणीभूत

जर आपण बघितले तर अनेक दशकांपासून तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सीमा वाद असून यामुळे सहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि दुर्गम भागात वसलेल्या या 14 गावांमध्ये दोन्ही राज्य सरकारकडून विकास कामे आणि योजनांच्या अंमलबजावणी केली जाते.

मजेशीर म्हणजे या दोन्ही गावांमध्ये सरपंच, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा तसेच आरोग्य केंद्र यासारख्या सर्व पायाभूत सुविधा देखील दोन-दोन आहेत. यामध्ये जर आपण वाद पाहिला तर तेलंगणा राज्यातील आदिलाबादच्या केरामेरी तहसीलमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलमध्ये येणारे हे 14 गावांवरील प्रादेशिक वाद आज जवळपास 1956 साली जेव्हा आंध्र प्रदेश राज्याची मागणी झाली होती त्यानंतर सुरू झाला. हे 14 गावे परंडोली आणि अंतापुर या दोन ग्रामपंचायती अंतर्गत येतात.

या सर्वांना विकास कामे करण्यासाठी मिळतात दोन स्वतंत्र निधी

या गावांची आणखी एक मजेशीर गोष्ट पाहिली तर परंडोली आणि अंतापुर या दोन्ही ग्रामपंचायतीसाठी जे काही सरपंच निवडून आलेले आहेत हे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे आहेत.

त्यामुळे त्यांना गावांचा विकास करण्यासाठी जो काही निधी येतो तो संबंधित सरकारकडून दोन स्वतंत्र पद्धतीने मिळतो. तसेच गावातील अनुसूचित जमाती व जाती समुदायातील नागरिकांकडे दोन्ही राज्यांचे रेशन कार्ड असल्यामुळे दोन्ही राज्यांकडून त्यांना रेशनचा लाभ मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe