अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  पोलीस दलातील ५०३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली. यामध्ये नेवासा पोलीस ठाण्यातील अकरा पुरुष व एक महिला कर्मचारी अशा बारा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

यामध्ये नेवासा पोलीस ठाण्यातील तीन हेडकॉन्स्टेबल, पाच पोलीस नाईक, चार पोलीस कॉन्स्टेबल आशा बारा कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. हेडकॉन्स्टेबल पदावरून सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी सुनील जरे, सुरेश कानडे, बाळासाहेब ठोंबरे यांना पदोन्नती मिळाली.

हेडकॉन्स्टेबल पदावरून सहायक पोलीस निरीक्षकपदी अशोक नागरगोजे, राजू काळे, पांडुरंग वीर, संदीप गायकवाड, भीमराव राठोड यांना पदोन्नती मिळाली. तसेच पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले अशोक कुदळे, सविता उंदरे,

भागवत शिंदे, नितीन भताने यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती मिळाली. पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,

पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.