Nana Patekar : नाना पाटेकर म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येतो ते एक साधारण चेहरे पट्टी असलेले आणि अगदी साधी राहणीमान असलेले व्यक्तिमत्त्व. परंतु भारतीय सिनेमासृष्टीमध्ये अगदी सुरुवातीपासून हे नाव खूप चर्चेत राहिले. अनेक प्रकारचे सर्वोत्तम चित्रपट देऊन नाना कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिले.
परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेले प्रसिद्धीच्या या वलयाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम नानांच्या आयुष्यावर त्यांनी न होऊ देता कायम जमिनीवर पाय ठेवून नाना आजही समाजात वावरत आहेत. बऱ्याच व्यक्तींना नानांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यांचे खरे नाव काय आहे? हे देखील आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. त्यामुळे याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये नाना पाटेकर यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही महत्त्वाची माहिती
नाना पाटेकर हे आपल्याला सगळ्यांना परिचयाचे नाव. परंतु जर आपण त्यांचे खरे नाव पाहिले तर ते विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांच्या जन्म नाव विश्वनाथ असे होते परंतु घरी जसं प्रत्येकाला एखाद्या विशिष्ट अशा नावाने हाक मारली जाते किंवा ओळखले जाते अगदी त्याचप्रमाणे विश्वनाथ पाटेकर यांच्या घरचे सगळे त्यांना नाना या नावानेच हाक मारत व त्यानंतर त्यांचे मित्र देखील त्यांना नाना या नावानेच ओळखू लागले.
विश्वनाथ पाटेकर यांनी नंतर कला आणि अभिनय क्षेत्रामध्ये देखील पदार्पण केले व याच नावाने स्वतःची ओळख निर्माण केली. नाना यांचा जन्म एक जानेवारी 1951 रोजी झाला व ते मूळचे राहणारे मुरुड जंजिराचे आहेत. नाना यांचे वडील हे उत्तम चित्रकार होते व त्यांच्यामुळेच त्यांना कलाक्षेत्राची एक प्रकारे आवड निर्माण झाली
व हीच आवड जोपासता यावी याकरिता त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या कालावधी दरम्यानच त्यांचे नाटकाशी संबंध आले व त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मात्र या प्रवासादरम्यान त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागले व या माध्यमातून ते इथपर्यंत पोहोचले.
आगामी काळात येणारा नाना यांचा चित्रपट
सध्या आगामी काही महिन्यांमध्ये नाना यांचा द वॅक्सिन वार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये नाना यांनी वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे. द वॅक्सिन वार या चित्रपटांमध्ये कोरोना कालावधीमध्ये कोरोनाची लस बनवण्याच्या स्पर्धेत भारत कशाप्रकारे मदत करतो हे संपूर्णपणे दाखवण्यात येणार आहे.