महाराष्ट्राची हास्यजत्रा हा एक सगळ्यांचा पसंतीचा आणि खूप लोकप्रिय असा मराठी कॉमेडी शो असून गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा एक मनोरंजनपर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक उत्कृष्ट असे विनोदी कलाकार असून आपल्याला हा कार्यक्रम पाहताना हसवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कसर या कलाकारांच्या माध्यमातून सोडण्यात येत नाही.
महाराष्ट्राची हास्य जत्रा ही एक भारतीय मराठी नाटक टेलिव्हिजन मालिका असून जी सोप ऑपेरा, नाटक आणि विनोदावर आधारित अशी मालिका असून 22 ऑगस्ट 2018 रोजी सोनी मराठी वाहिनीवर सुरू झाली होती. सध्या या मालिकेमध्ये शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले आणि गौरव मोरे इत्यादी विनोदी कलाकार काम करतात. याच अनुषंगाने या लेखात आपण नेमके या कलाकारांना या विनोदी मालिकेच्या एका भागासाठी किती मानधन मिळते? याबद्दल माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील कलाकारांना किती मिळते मानधन?
1- शिवाली परब– महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी मालिकेतील शिवाली परब ह्या एक प्रसिद्ध विनोदी कलाकार असून ते एका भागासाठी साधारणपणे 35 ते 37 हजार रुपये इतके मानधन घेतात.
2- वनिता खरात– वनिता खरात हे नाव मराठी सह बॉलीवूड मध्ये देखील एक प्रसिद्ध नाव असून सगळ्यांना माहिती असलेले हे नाव आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील एका भागासाठी वनिता खरात हे 32 ते 35 हजार रुपये मानधन घेतात.
3- रसिका वेंगुर्लेकर– कला क्षेत्रातील हे एक प्रसिद्ध नाव असून सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असणाऱ्या रसिका वेंगुर्लेकर हे महाराष्ट्राचे हास्य जत्राच्या एका भागाकरिता 25 ते 30 हजार रुपये इतके मानधन घेतात.
4- नम्रता संभेराव– हे देखील एक प्रसिद्ध नाव असून नम्रता संभेराव महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या एका भागाकरिता तीस ते 37 हजार रुपये इतके मानधन घेतात.
5- अरुण कदम– अरुण कदम हे एक अतिशय विनोदी कलाकार असून खूप प्रसिद्ध आहेत. अरुण कदम हे महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेच्या एका भागाकरिता तीस ते पस्तीस हजार रुपये इतके मानधन घेतात.
6- प्रसाद खांडेकर– जर आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील इतर कलाकारांच्या मानधनाच्या तुलनेत विचार केला तर प्रसाद खांडेकर हे थोडं जास्त मानधन घेतात. म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेच्या एका भागाकरिता ते 40 ते 50 हजार रुपये घेतात.
7- समीर चौगुले– समीर चौगुले हे व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या मालिकेचा प्राण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते एक उत्तम विनोदी कलाकार तर आहेतच परंतु एक उत्तम लेखक व अभिनेता म्हणून देखील त्यांची ओळख आहे. समीर चौगुले महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या एका भागाकरिता 40 ते 50 हजार रुपये घेतात.
8- गौरव मोरे– गौरव मोरे हे नाव देखील खूप प्रसिद्ध असून महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेमध्ये एक उत्तम विनोदी कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गौरव मोरे हे महाराष्ट्राची हास्य जत्राच्या एका भागाकरिता 40 ते 50 हजार रुपये मानधन घेतात.