मनोरंजनाचा होणार धमाका ! येतायेत ‘या’ ५ वेब सिरीज, मनोरंजन..थ्रिलिंग अन बरच काही..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Web series : आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज रिलीज होत आहेत. 2023 – 24 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या आगामी काही वेब सीरिज तुमच्यासाठी खूप रोमांचक असतील.

पण यात चांगली वेब सीरिज शोधणं खूप अवघड असतं, त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 आगामी वेब सीरिज, तसेच त्यांच्या रिलीज डेट आणि ही सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार याबद्दल सांगणार आहोत, तर चला जाणून घेऊया.

स्क्विड गेम: द चॅलेंज

गेल्या वर्षीची स्क्विड गेम ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरीज मध्ये 7 गेम खेळले जातात, ज्यात 456 लोक भाग घेतात आणि एकच विजेता असतो. या खेळाचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. तेव्हापासून लोक त्याच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत होते.

नेटफ्लिक्सने आता या सीरीजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. आता “स्क्विड गेम” या लोकप्रिय वेब सीरिजचा “स्क्विड गेम : द चॅलेंज” च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आला आहे. हा ट्रेलर खूपच मजेशीर आणि इंटरेस्टिंग आहे. ही वेब सीरिज 22 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

मिर्झापूर (Season 3)

ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेल्या मिर्झापूरचा तिसरा सीझन लवकरच रिलीज होणार आहे. या सीरिजचे पहिले दोन सीझन प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल,

दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग पूर्ण झालं आहे. हा शो 25 नोव्हेंबर 2023 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

बर्लिन

नेटफ्लिक्सने मनी हाइस्ट यामधील सुपरहिट पात्र बर्लिनवर आधारित नव्या सीरीजचा टीझर रिलीज केला आहे. मनी हीस्टच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. “बर्लिन” असं या सीरीजचं नाव असून ही सीरीज बर्लिनच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. नेटफ्लिक्सने या सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख 29 डिसेंबर 2023 जाहीर केली आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.

द रेलवे मॅन

भोपाळ गॅस दुर्घटनेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांचे धाडस आणि बलिदान दाखवणारी ‘द रेल्वे मॅन’ ही नवी वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये आर. माधवन, के.के. मेनन, दिव्येंदू शर्मा, बाबिल खान यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

इंडियन पुलिस फोर्स

रोहित शेट्टीची अपकमिंग फिल्म ‘इंडियन पोलिस फोर्स’ पुढील वर्षी 19 जानेवारीला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तिन्ही कलाकार पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत.