file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर १ भागातील दशमेश चौकात एका तरुणाला पोलिसांनी तलवारीसह पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पवार यांना आरोपी मनोज नवनाथ इंगळे(वय 32 वर्षे,राहणार -गोंधवणी रोड,वॉर्ड नंबर 1,श्रीरामपूर ) याच्याकडे एक धारदार व टोकदार अशी तलवार विनापरवाना बेकायदेशीररीत्या मिळून आल्याने याप्रकरणी त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून

गुन्हा रजिस्टर नंबर 517/2021 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिघे हे करीत आहेत.