7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार निराशा? डीएच्या बाबतीत मोठी अपडेट समोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay commission  :-  जर तुम्ही स्वतः केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य केंद्र सरकारच्या सेवेत असतील तर तुमच्याकरिता ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय कर्मचारी बऱ्याच दिवसापासून महागाई भत्त्यातील वाढीसंदर्भात प्रतीक्षा करत असून  किती महागाई भत्ता वाढवला जाणार याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

साधारणपणे बऱ्याच दिवसापासून अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत आहे की सध्या अस्तित्वात असलेल्या 42 टक्के महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करून तो 46 टक्के होईल. परंतु जर आपण याबाबत समोर आलेली अपडेट पाहिली तर यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची काहीशी निराशाच होईल असे दिसून येते.

 केंद्र सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकार देशातील एक कोटींपेक्षा अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जे काही सूत्र मान्य केलेले आहे त्यानुसार महागाई भत्त्यामध्ये चार ऐवजी तीन टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता असून जर असे झाले तर महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 45 टक्के होण्याची शक्यता आहे.

जर यामध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होईल. जर यामध्ये आपण कामगारांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा विचार केला तर त्यांच्या करिता महागाई भत्ता हा कामगार ब्युरोच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI-IW च्या आधारे ठरवला जातो. कामगार ब्युरो म्हणजेच लेबर ब्युरो हे कामगार मंत्रालयाची एक शाखा आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा विचार केला तर याबाबत माहिती देताना ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटले की जून 2023 साठीचा CPI-IW 31 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यानुसार आम्ही महागाई भत्तामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्याची मागणी करत आहोत.

परंतु सरकार या ऐवजी तीन टक्क्यांनी वाढ करू शकते. त्यांनी पुढे म्हटले की सरकार डीए दशांश अंशापेक्षा वाढवण्याचा विचार करत नाही आणि त्यामुळे तो 45%च होण्याची शक्यता आहे. पुढे त्यांनी अधीकची माहिती देताना म्हटले की, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा महसूल विभाग  महसुली परिणामांसह महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करायला आणि तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवेल. साधारण एक जुलै 2023 पासून महागाई भत्त्याची वाढ लागू होणार आहे.

 महागाई भत्त्यात शेवटची वाढ कधी झाली होती?

सध्या केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये शेवटचा बदल हा 24 मार्च 2023 रोजी करण्यात आला होता व हा करण्यात आलेला बदल एक जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे.

 महागाई भत्ता कसा मोजला जातो?

महागाई भत्ता निश्चित करण्याकरिता एक सूत्र देण्यात आले असून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे सूत्र पुढील प्रमाणे आहे…

[( गेल्या बारा महिन्याच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची म्हणजेच एआयसीपीआय सरासरी -115.76)/115.76]×100

तसेच पी एस यु म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या महागाई भत्त्याबद्दल गणना करण्याची पद्धतीचे सूत्र हे…

महागाई भत्ता टक्केवारी=( या तीन महिन्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी( आधारभूत वर्ष 2001=100)-126.33) )×100

अशा सूत्रानुसार महागाई भत्ता मोजला जातो.