अहमदनगर भाजपचा ‘तो’ नगरसेवक सराईत गुन्हेगार, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोषारोपपत्र, अधिवेशनातही पडसाद

Ahmednagarlive24
Published:
Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. खून, हाणामारी आदी प्रकरणे आता वरचेवर घडू लागले आहेत. नुकतेच झालेले राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यभर गाजले.

अगदी अधिवेशनात देखील त्याचे पडसात उमटले. या हत्येप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात चार अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. १५ जुलै रोजी सावेडीतील एकवीरा चौकात अंकुश चत्तर याची हत्या करण्यात आली होती.

बाळासाहेब सोमवंशी यांनी फिर्याद दिल्यानंतर या खुनाचा तपास सुरु झाला. सुरवातीला तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपास केला. परंतु गुन्ह्याचे गांभीर्य पाहता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सखोल चौकशी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या हत्ये प्रकरणी नगरसेवक स्वप्निल शिंदे सह अक्षय हाके, अभिजित बुलाख, महेश कुर्‍हे, सूरज ऊर्फ विकी कांबळे, मिथुन धात्रे, राजू फुलारी आणि अरुण पवार यांच्यावरही दोषारोपपत्र दाखल केले गेले आहे.

या प्रकरणी अटकेत असणारा भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्याविरोधात खून, धमकावणे आदींसह सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अभिजित बुलाख देखील सहा गुन्ह्यांत आरोपी आहे. महेश कुऱ्हे आणि मिथुन धोत्रे यांच्यावरही गुन्हा दाखल आहेत. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

अधिवेशनातही गाजला होता मुद्दा –
या हत्ये प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरत याची विचारणा केली होती. थोरातांनी यावर स्थगन प्रस्ताव मांडला. याचे उत्तरही देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe