Ahmednagar Politics : पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Politics :- स्वताच्या तालुक्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत. त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही.आमच्या तालुक्‍यातील जनता विकासाला साथ देणारी आहे.

इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका.पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी खोचक टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शहरात मुस्लिम खिश्चन गोसावी आणि लिंगायत समाजाकरीता दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पाटील यांचा समाजातर्फे सत्कार आयोजन करण्यात आला.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमिताने सेवा पंधरवडा सुरू आहे. यानिमित्ताने मुस्लीम,ख्रिश्चन गोसावी आणि लिंगायत समाजा करीता सेवाभावी काम करण्याचे भाग्य मला घेता आले.

आज शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्‍त जिल्हाधिकारी कार्यालय ही उतर नगर जिल्ह्याकरीता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपयांचा निधी लवकरच मंजूर होईल.

विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात. केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाहीत. अनेकांना महसूल मंत्री पदाची संधी मिळाली पण जिल्ह्यासाठी काहीच करणे यांना सुचले नाही.

व्यक्तिद्वेष करून तालुक्‍यातील जनतेचे प्रपंच उध्वस्त करू नका. आमच्याकडे वाळू आणि क्रशरचे माफीयाराज नाही. महसूल विभागात काही कठोर निर्णय केले. यामुळे अनेकांची चिडचिड वाढली असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकासाठी अजून निधी उपलब्ध करून देणार असून शहीद जवानांची स्मारक ही स्फूर्तीस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकाच्या भूमीपूजनाचे औचित्य साधून मेरी माटी मेरा देश उपक्रमाचा शुभारंभ ना.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe