Baramukhi Waterfalls : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटामध्ये दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे…….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Baramukhi Waterfalls : महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर लाभले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकण किनारपट्टी तसेच सातपुडा पर्वतरांगा इत्यादी परिसरामध्ये खूप  मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या स्थळांचा विकास आणि लागणारे आवश्यक सोयी सुविधा  शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत. परंतु यामध्ये अजून देखील महाराष्ट्रातील असे अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ठिकाणे आहेत जे शासनाच्या दुर्लक्षामुळे अजून देखील नावारूपाला आलेले नाहीत.

असाच सरकारच्या दुर्लक्ष म्हणा किंवा दूरदृष्टीची कमतरता यामुळे निसर्गात सौंदर्याची उधळण असलेल्या सातपुडा डोंगररांगा अजून देखील पर्यटनाच्या बाबतीत खूप मागासल्या असून या ठिकाणी असलेल्या पर्यटन विकासाकडे हवे तेवढे लक्ष दिले गेलेले नाही. याच परिसरामध्ये नंदुरबार जिल्हा असून या ठिकाणी बारामुखी हा अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गाने समृद्ध असलेल्या धबधबा आहे. परंतु या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे.

 स्वदेश चित्रपटात दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात

बारामुखी धबधबा हा नंदुरबार जिल्ह्यात असून शाहरुख खानच्या गाजलेल्या स्वदेश या सिनेमामध्ये देखील हा धबधबा दाखवण्यात आलेला होता. परंतु हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कारण त्या ठिकाणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुर्घटना होत आहेत. तरी देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ज्या काही आवश्यक उपाययोजना लागतात त्या करण्यात आलेल्या  नाहीत.

महाराष्ट्र आणि गुजरात ही एकमेकांना शेजारी असलेली राज्य असून गुजरातचा विचार केला तर  नर्मदा नदीवरचे  सरदार सरोवर व या ठिकाणचा परिसर हा खूप विकसित करण्यात आला असून त्याला पर्यटन पंढरी म्हणून देखील ओळख मिळाली आहे. या परिसराच्या अगदी शेजारी असलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर महाराष्ट्रात आहे. परंतु तरीदेखील या ठिकाणी या सरदार सरोवराचा पाण्याचा फायदा देखील मिळालेला नाही.

ज्याप्रमाणे सरदार सरोवर आणि त्या ठिकाणी असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी  या ठिकाणांना जागतिक पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले गेले तेवढे प्रयत्न हे महाराष्ट्रात असलेल्या सातपुडा डोंगर रांगांच्या बाबतीत केले गेले नाहीत. जर आपण साधारणपणे सातपुडा डोंगर रांगा आणि प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी कुपोषण तसेच बेरोजगारी, नागरिकांचे स्थलांतर हे गंभीर प्रश्न असून यावर सरकारने आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत.

जर शासनाने या भागांमध्ये स्थानिक लोकांना सोबत घेऊन जर पर्यटनाचा विकास केला तर पर्यटनाच्या संधी निर्माण होतील व स्थानिकांचा देखील विकास होण्यास मदत होईल. सातपुडा डोंगर रांगांमध्ये तोरणमाळ आणि डाब ही थंड हवेचे ठिकाणे आहेत. एवढेच नाही तर या ठिकाणी कित्येक मैल नर्मदेचे अडवलेले पाणी देखील आहे.  बिलगाव चा ऐतिहासिक धबधबा देखील आहे व या धबधब्यालाच बारामुखी धबधबादेखील म्हटलं जातं.

उदय नावाच्या नदीवर हा धबधबा असून पावसाळ्यामध्ये याचे रुप अधिकच खुलून दिसत असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.तसेच या डोंगर रांगांमध्ये अनेक औषधी वनस्पती व महूची फुले देखील मोठ्या प्रमाणावर मिळतात. परंतु अजून देखील सरकारी अनास्थेमुळे हा भाग पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित आहे. बारामुखी धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा 12 वेगवेगळ्या ठिकाणावरून एकच ठिकाणी वाहतो.

साधारणपणे अशा प्रकारचा धबधबा हा देशामध्ये हाच असावा. अभिनेता शाहरुख खान यांचा स्वदेश चित्रपट याच  बारामुखी धबधब्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे प्रेरणेतून तयार करण्यात आला होता. धबधबा दिसायला खूप आकर्षक आहे. परंतु तितका जीवघेणा देखील आहे.

कारण या धबधब्याचे सौंदर्य पाहून अनेकांना या ठिकाणी असलेल्या पाण्यात उतरण्याचा मोह होतो व उतरल्यानंतर पाण्याचा नेमका अंदाज न आल्यामुळे बऱ्याच जणांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी जोपर्यंत या धबधब्यावर सुरक्षा कठळे तयार केले जात नाही तोपर्यंत पर्यटकांना बंदी घातली आहे.या ठिकाणी जर सुरक्षित कठळे दिले तर या दिवसांमध्ये पर्यटनाला चालना मिळू शकते व या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना रोजगाराचे एक नवीन संधी देखील मिळू शकते.