Big Breaking : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं ! मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तब्बल १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आज अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं.

सरकारला महिन्याभराचा अवधी देण्याचा निर्णय बुधवारीच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जोपर्यंत येत नाहीत. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं.

सतरा दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली. समाजसेवक असलेले 41 वर्षीय मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले पण त्याबाबत फारसं कोणाला माहितीच नव्हतं. पण जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मात्र हे उपोषण राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थळी पोहोचतात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आपण एक इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे. ती मुदत आणखी दहा दिवसांनी वाढवून देतो. पण, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचं आहे.

“या टाळ्यांचा विजय होईल हा शब्द देतो. तुमची टाळी वाया जाणार नाही. मी २९ ऑगस्टला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकवेळी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे,” असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.

दरम्यान अंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर इत्याही नेते उपस्थित होते.