Business Idea : कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय आणि महिन्याला करा 30 ते 35 हजाराची बंपर कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea :- व्यवसायाची निवड करताना ती कमीत कमी खर्चामध्ये चांगला आर्थिक नफा देणाऱ्या व्यवसायाची करावी. कारण आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल देखील सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते आणि  व्यवसाय उत्तम मागणी असणारा असल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न देखील चांगले मिळते. अशा अनेक व्यवसायांची यादी आपल्याला माहिती असते परंतु यामधून कोणत्या व्यवसायाची निवड करावी हे प्रामुख्याने आपल्याला उमजत नाही.

साधारणपणे आपण जर कमीत कमी गुंतवणुकीत सुरू होणारे व चांगला आर्थिक नफा देणारे व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये खाद्यपदार्थांशी निगडित असलेले व्यवसाय हे खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे या लेखात आपण कमीत कमी खर्चामध्ये सुरू करता येऊ शकणाऱ्या आणि 30 ते 35 हजार रुपये महिन्याला कमाई देईल असा व्यवसाय पाहणार आहोत.

 फूड कार्ट व्यवसायामधील मोमोज व्यवसाय आहे फायद्याचा

फूड कार्ट व्यवसायाचा विचार केला तर हे व्यवसाय कमीत कमी खर्चामध्ये सुरू होतात. यामधीलच आपण मोमोज व्यवसाय काय आहे याबद्दल माहिती घेतली तर मोमोज हा खाद्य पदार्थ असून जवळपास भारतातील सर्वच राज्यांमध्ये याला मागणी आहे. मोमोज दोन प्रकारचे असतात त्यातील एक म्हणजे व्हेज आणि दुसरा म्हणजे चिकन मोमोज हे होय. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये  मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. यातून दिवसाला दोन ते तीन हजार रुपये व्यवस्थितपणे आपण कमावू शकतो.

 अगोदर जागेची निवड योग्य ठिकाणी करावी

फूड कार्ट करिता तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्ही ती भाडे कराराने देखील घेऊ शकतात. यामध्ये तुमचे गाव किंवा शहराच्या परिस्थितीनुसार जागेची किंमत किंवा भाड्याचा दर वेगळा असू शकतो. जागेची निवड करताना ज्या ठिकाणी लोकांची गर्दी जास्त असते अशा ठिकाणी म्हणजेच एखादे हॉस्पिटल किंवा बाजारपेठ, रेल्वे स्टेशन किंवा कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा एखादी शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल किंवा मॉल या ठिकाणी जागा निवडल्यास तुमचा व्यवसाय भरभराट करू शकतो. तसेच तुम्ही बनवत असलेले मोमोज चविष्ट असतील तर कितीही लांबून लोक येतील व तुमच्याकडे रांगा लावतील.

 या व्यवसायासाठी लागणारी साधने

मोमोज व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला मोमोज बनवण्याकरिता फूड कार्ट व्हॅन, गॅस स्टोव्ह किंवा गॅस सिलेंडर, गाळणे, वाटी तसेच मोमोज ठेवण्यासाठी भांडे व काही आवश्यक छोटी भांडी इत्यादी उपकरणे लागतील व याकरिता दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला खर्च करणे गरजेचे आहे.

 मोमोज बनवण्याकरता लागणारे साहित्य

मोमोज बनवण्याकरिता तुम्हाला पीठ, भाज्या तसेच मसाले, चिकन, टोमॅटो सॉस, व्हाईट सॉस, मोमोज सॉस तसेच पनीर, म्यावनिज सॉस इत्यादी आवश्यक साहित्य यासाठी खरेदी करणे गरजेचे आहे. यासाठी लागणारे पैसे तुमची स्थानिक बाजारपेठ आणि स्थितीनुसार बदलू शकते.

 मोमोजची किंमत किती असते?

तुम्हाला व्यवसाय सुरू केल्यानंतर मोमोज ची किंमत किती ठेवायची हे तुमच्यावर सगळे अवलंबून आहे.या आधारे तुम्ही तुमच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज बांधू शकतात. जर साधारणपणे आपण सरासरी किंमत पाहिली तर व्हेज मोमोज ची किंमत ही सहा पिसेस साठी 80 रुपये असते तर चिकन मोमोज ची किंमत सहा पिसेस करिता 120 रुपये आहे.

व्यवसाय चांगला सुरू झाल्यानंतर जर तुम्ही दिवसांमध्ये शंभर प्लेट नॉनव्हेज मोमोज विकले तरी तुम्ही 12,000 पर्यंत कमाई करू शकतात आणि व्हेज मोमोज  एक प्लेट 80 प्रमाणे जर 100 प्लेटची विक्री केली तर 8000 दिवसाचे उत्पन्न मिळवू शकतात.

 व्यवसायाची जाहिरात कशी करावी?

इतर व्यवसायाप्रमाणे या व्यवसायाची देखील प्रसिद्धी मिळवण्याकरिता जाहिरात करणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही डिजिटल ची मदत घेऊन स्वतःची जाहिरात करू शकतात. यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम तसे व्हाट्सअप चा वापर करू शकतात किंवा बॅनर किंवा पॅम्प्लेट प्रिंट करून ते गावातील किंवा शहरातील लोकांमध्ये वाटून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकतात. तुम्ही ज्या ठिकाणी तुमची फूड कार्ट व्यवसायाची गाडी लावाल त्या ठिकाणी एक मोठा बॅनर लावणे देखील गरजेचे आहे.

या पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.