DA Hike :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकार आता काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. जर आपण भारताचा विचार केला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुका येऊ घातल्या असून या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे काही निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता वाढ हा असून रखडलेल्या महागाई भत्ता थकबाकीचे पैसे मिळावे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन मोठ्या भेट मिळण्याची शक्यता असून रखडलेल्या महागाई भत्ता थकबाकीचे पैसे देण्यासोबतच सरकार महागाई भत्त्यामध्ये देखील भरघोस वाढ करेल अशी एक सध्या चर्चा होताना दिसून येत आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार विचार केला तर महागाई भत्तामध्ये सुमारे चार टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जे काही मूळ पगार आहे यामध्ये देखील चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 18 महिन्यांपासून जी काही महागाई भत्त्याची थकबाकी रखडलेली आहे ती देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा दावा करण्यात आला आहे. जर कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामध्ये 18 महिन्यांची महागाईभत्ता थकबाकीची रक्कम जर आली तर काही अहवालानुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिकची महागाई भत्त्याची रक्कम वर्ग एक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे.
जर आपण महागाई भत्ता थकबाकीचा विचार केला तर ती एक जानेवारी 2020 ते 30 जून 2021 म्हणजेच एकूण 18 महिन्याच्या कालावधीतील ही महागाई भत्त्याची थकबाकी रोखण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही रखडलेली थकबाकी मिळावी याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
यावर अजून केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये लवकरच हे पैसे मिळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये याबाबत काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणे तितकच गरजेचे आहे.