DA Hike:- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा विषय असलेला महागाई भत्ता व त्यासंबंधीची गोड बातमी या महिन्यात येण्याची शक्यता असून जुलैमध्ये जो काही एआयसीपीआय निर्देशांक येईल त्याच्या आकड्यांवरून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती प्रमाणात महागाई भत्ता मिळणार हे स्पष्ट होणार आहे. साहजिकच याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ करण्याचा सरकारचा विचार असून जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाईभत्त्यात वाढ होईल अशी शक्यता आहे.
एआयसीपीआय निर्देशांक क्रमांक महागाई भत्त्याची गणना निश्चित करणारा डेटा
जर आपण महागाई भत्ता वाढीचा विचार केला तर यामध्ये जुलै महिन्याचा एआयसीपीआय निर्देशांक क्रमांक हा यासाठीच्या गणना निश्चित करणारा एक शेवटचा महत्वाचा डेटा असणार आहे. या डेटाच्या आधारेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होईल हे निश्चित होणार आहे. परंतु साधारणपणे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे महागाई भत्त्यातील ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार होणार आहे. सध्याचा महागाई भत्त्यातील वाढीचा एकंदरीत विचार केला तर मार्च 2023 मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केलेली होती व ती जानेवारी 2023 पासून लागू होती. परंतु आता जुलै 2023 मध्ये यासंबंधीचा पुढचा फेरविचार होणार असून त्याची अधिकृतरित्या घोषणा ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
जर आपण यावर्षीचा एआयसीपीआय निर्देशांक पाहिला तर तो मे 2023 मध्ये 45.58 टक्क्यांवर होता. आता यावेळी निर्देशांक हा 134.7 इतका आहे. जून महिन्यामध्ये ही आकडेवारी किती होती हे अजून समोर आलेले नाही. या आधारे विचार केला तर महागाई भत्त्यात किमान चार टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
जानेवारी ते जुलै या सहामाहीचा विचार केला तर सरकारने महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ केली होती व सध्या तो 42 टक्क्यांवर आहे. आता केंद्र सरकारने जर यामध्ये चार टक्क्यांची वाढ पुन्हा केली तर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 42 वरून 46 टक्के होणार आहे. महागाई भत्त्याचा विचार केला तर देशातील महागाईचा दर नेमका किती आहे यावर महागाई भत्त्यातील वाढ अवलंबून असते. देशातील महागाई ज्या दराने वाढत आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते.