Exclusive

Dairy Business Idea : डेअरी उद्योग कसा सुरु करायचा ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

Published by
Ajay Patil

  Dairy Business:  कृषी आणि कृषी संबंधित असलेले उद्योग हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण आता शेती आधारित उद्योगांकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. परंतु जर आपण कुठल्याही व्यवसायाचा विचार केला तर त्या व्यवसायातील बारकावे, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाची बारकावे व्यवस्थितपणे शिकूनच व्यवसायाचे मुहूर्तमेढ रोवणे फायद्याचे ठरते. कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रामुख्याने शेतकरी पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात.

परंतु या व्यवसायामध्ये देखील अनेक प्रकारचे तंत्रज्ञान तसेच व्यावसायिक बारकावे असल्यामुळे यासंबंधीचे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करणे नक्कीच भविष्यकालीन फायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या व्यवसायामध्ये अनेक ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे बरेच शेतकरी बंधूंना आणि तरुणांना नेमके यासंबंधीचे प्रशिक्षण कुठे मिळते या संबंधीची माहिती नसते.

अशा शेतकऱ्यांसाठी एडीटी बारामती फाउंडेशन आणि अटल इनोव्हेशन मिशन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने डेअरी उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून यामध्ये प्रशिक्षणार्थींची नोंदणी देखील सुरू करण्यात आलेली आहे.त्यामुळे सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

 कशा पद्धतीचा आहे हा उद्योजकता विकास कार्यक्रम?

1- महत्त्वाचे म्हणजे या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये नेदरलँड तसेच इजराइल व ब्राझील मधून पशुसंवर्धन आणि दूध आणि दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये प्रशिक्षित असलेल्या तज्ञांचे सत्रे आयोजित करण्यात आलेली आहे.

2- तसेच या प्रशिक्षणा दरम्यान जागतिक दर्जाचे जे काही गाई व म्हशींचे गोठे आणि डेरी प्रोसेसिंग युनिट आहे त्या ठिकाणी देखील भेट देता येणार आहे.

3- तसेच या कार्यक्रमांतर्गत इन व्हिट्रो फर्टीलायझेशन, पशूंचे पोषण आहाराची तपासणी तसेच कृत्रिम रेतन आणि पशुंचे रोगाचे निदान  अशा प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांना देखील भेट देता येणे शक्य आहे.

4- तसेच या कार्यक्रमांतर्गत 20 पेक्षा जास्त दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करण्याचा अनुभव देखील मिळणार आहे.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना निती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशन लोगो असलेले एक प्रमाणपत्र मिळणार असून जे तुम्हाला तुमच्या उद्योगाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि शासनाच्या अनेक अनुदान योजनांमध्ये खूप फायद्याचा ठरणार आहे.

 प्रशिक्षण मर्यादा तसेच निकष शुल्क

या उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये फक्त वीस प्रशिक्षणार्थीच सहभाग नोंदवू शकणार असून याकरिता जेवण व राहण्याची सोय तसेच जीएसटी इत्यादी सहित 5000 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

 प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष

या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये कृषी पदवीधर तसेच फूड टेक विद्यार्थी, इतर शैक्षणिक प्रवाहातील विद्यार्थी तसेच शेतकरी, तरुण उद्योजक आणि महिला व पुरुष बचत गट यांचा समावेश असणार आहे.

 या कालावधीत पार पडेल हा कार्यक्रम

डेअरी उद्योजकता विकास कार्यक्रम हा 21 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणारा असून 23 ऑगस्ट 2023 रोजी त्याचा समारोप होणार आहे. म्हणजे साधारणपणे तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे. या दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत हा कार्यक्रम सुरू राहील.

 नोंदणी शुल्क भरायचे असेल किंवा थेट नोंदणी करायचे असेल तर या ठिकाणी साधा संपर्क

अभिषेक गीते (मो.न) 9518976034

Ajay Patil