Gardening Tips: घराजवळील बगीच्यातील किंवा कुंडीतील गुलाबाला फुले येत नाही का? करा हे उपाय! गुलाबाला येतील भरपूर फुले

Ajay Patil
Published:
gardening tips

Gardening Tips:- आपल्यापैकी प्रत्येक जण घर सुंदर आणि आकर्षक दिसावे याकरिता घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी करतात व याकरिता विविध प्रकारच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. तसेच घर आकर्षक दिसावे याकरिता घराच्या पुढे जी काही मोकळी जागा असते त्या ठिकाणी छोटेखानी बगीचा विकसित केला जातो व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुल झाडांची लागवड केली जाते किंवा घराच्या गॅलरी आणि टेरेस मध्ये कुंड्या ठेवून देखील विविध प्रकारचे फुलझाडे आकर्षक पद्धतीने लागवड केले जातात व घराच्या सौंदर्यामध्ये भर पाडली जाते.

आपण जी काही फुल झाडे लावतो त्या फुल झाडांची प्रत्येक जण व्यवस्थित काळजी घेत असतात. परंतु बऱ्याचदा व्यवस्थित काळजी घेऊन देखील फुलांच्या रोपांना फुलं येते नाहीत किंवा फुलांच्या कळ्या लागत नाहीत. त्याकरिता वेगवेगळे उपाय योजना केल्या जातात.परंतु तरी देखील अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

खास करून जर आपण गुलाबाच्या बाबतीत विचार केला तर बऱ्याचदा गुलाबाच्या फुलाला चांगल्या प्रकारची फुले येत नाही किंवा कळ्या लागत नाही. त्यामुळे गुलाबाचे झाड चांगले खुलून दिसत नाही. या अनुषंगाने जर तुमच्या घरातील कुंडीत किंवा बगीच्यात लावलेल्या गुलाबाला जर जास्त फुले यावीत असे तुम्हाला वाटत असेल तर या लेखामध्ये सांगितलेले सोपे उपाय करून पहावे.

 गुलाबाला फुले येण्यासाठी साधे सोपे उपाय

1- कांद्याची टरफले किंवा साल बऱ्याचदा जेव्हा आपण घरामध्ये कांदा कापतो किंवा चिरतो तेव्हा त्यापासून निघालेले टरफले फेकून देतो. परंतु या टरफलापासून जर वेगळ्या पद्धतीचे खत तयार केले तर त्याचे खूप मोठे फायदे मिळतात. गुलाबाच्या झाडाला फुले येत नसतील किंवा झाड लवकर वाळत असेल तर तुम्ही कांद्याच्या टरफलापासून तयार केलेल्या खताचा वापर करून मातीला पोषक तत्व तुम्ही पुरवू शकतात.

यामुळे गुलाबाच्या रोपामध्ये ओलावा राहतो आणि झाड वाळत नाही. एवढेच नाही तर गुलाबाच्या रोपाची वाढ देखील चांगली होते व झाड अधिक आकर्षक दिसायला लागते. तसेच तुम्ही याकरिता लिक्विड फर्टीलायझरचा देखील वापर करू शकता व आठवड्यात दोन ते तीन वेळा हा उपाय करणे गरजेचे असते.

2- कांद्याच्या पाण्याचा वापर एखादे जार किंवा मग यामध्ये तुम्ही कांद्याची साल व पाणी भरून ठेवा व साधारणपणे दोन ते तीन दिवस ते तसेच राहू द्या. नंतर ते पाणी गाळून हे पाणी गुलाबाच्या मुळाना घालावे. त्यामुळे गुलाबाच्या रोपाला चांगले फुले यायला सुरुवात होते.

3- शेणाचा वापर करावा गुलाबाच्या झाडाच्या मुळांमध्ये तुम्ही सुकलेले शेणाचा वापर करू शकतात. शेणाचा वापर करताना जेव्हा तुम्ही शेण घालाल तेव्हा मातीला पाणी देत राहावे व त्यामुळे झाडाची वाढ वेगात होते व कीड सुद्धा लागत नाही. हा उपाय केल्यामुळे काही दिवसांमध्ये गुलाबाच्या झाडाला चांगल्या कळ्या यायला सुरुवात होते.

4- कॉफीचा वापर कॉफी हे एक चांगल्या प्रकारचे फर्टीलायझर म्हणजेच खत असून गुलाब व मोगरा या महत्त्वाच्या फुल झाडांसाठी ते एक महत्त्वाचे असे खत आहे. जर तुम्ही कॉफीचा वापर खत म्हणून केला तर गुलाब किंवा मोगराच्या झाडांमध्ये जी काही नायट्रोजनची कमतरता भासते ती कमी होते. याकरिता तुम्ही एक चमचा कॉफी मातीमध्ये मिसळावी आणि पंधरा दिवसांच्या अंतराने हा प्रयोग पुन्हा करावा. या प्रयोगामुळे गुलाबाच्या झाडाची किंवा रोपाची वाढ उत्तम होते व फुले देखील चांगले येतात.

5- मातीचा वापर ठरेल फायद्याचा गुलाबाचे रोप तुम्ही ज्या कुंडीत किंवा ज्या ठिकाणी लागवड केलेली असते त्या रोपांमध्ये जर तुम्ही पाच ते आठ पीएच म्हणजेच सामू असलेल्या मातीचा वापर केला तर गुलाबाच्या झाडाला खूप चांगल्या प्रकारची फुले येतात. तसेच तुम्ही मातीमध्ये शेण किंवा गांडूळ खत व कोकोपीट चा देखील वापर करू शकता.

या पद्धतीने तुम्ही हे साधे आणि सोपे उपाय केले तर तुमच्या बगीच्यात किंवा कुंडीत लावलेल्या गुलाबाच्या रोपट्याला नक्कीच मोठ्या प्रमाणावर आकर्षक असा फुलांचा बहर येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe