Gardening Tips:- बऱ्याचदा आपले घर असते किंवा जेव्हा नवीन घर बांधले जाते तेव्हा घराच्या बाजूंनी बऱ्याच प्रमाणात जागा मोकळी सोडली जाते व या सोडलेल्या मोकळ्या जागेमध्ये अनेक शोभेची झाडे, फुलझाडे इत्यादी लावले जातात. जेणेकरून घराची शोभा वाढावी आणि वातावरण प्रसन्न राहावे हा त्यामागचा प्रामुख्याने उद्देश असतो. बरेच जण गुलाब, चाफा तसेच जास्वंद इत्यादी फुल झाडांची देखील लागवड करतात.
अशा प्रकारची झाडे लावण्या मागचा जो काही उद्देश असतो तो पूर्ण होतो परंतु बऱ्याचदा सुवासिक वास असलेली फुलांची झाडे तुमच्या घरामध्ये किंवा घराजवळ साप येतील या पद्धतीचे वातावरण निर्माण करू शकतात किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे हे आपण आमंत्रण देण्यासारखेच आहे.
आता बरेच जण म्हणतात की चंदनाचा वासामुळे चंदनाच्या झाडांजवळ साप फिरकतात व याच कारणामुळे बरेच लोक घराजवळ चंदनाची झाडे कधीच लावत नाही. चंदनाव्यतिरिक्त देखील दुसरे असे अनेक फुलझाडे किंवा तीव्रवासाची झाडे आहेत ज्यांच्याजवळ साप येऊ शकतात. याच विषयाची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
कोणत्या झाडाजवळ साप आकर्षित होतात?
1- सरु अथवा सायप्रेस– बरेच लोक घराजवळ मोठा घेर असलेली डेरेदार झाडे लावतात. अशा झाडांमुळे घर अगदी खुलून दिसते. अगदी याच पद्धतीची सायप्रेस अथवा सरू एक वनस्पती असून ती एक शोभेची वनस्पती म्हणून ओळखली जाते व खूप आकर्षित व सुंदर दिसते. ही वनस्पती खूप दाट असते. याच दाटीमुळे या झाडावर साप लपण्याची शक्यता असते. त्यामुळे हे वनस्पती घराजवळ लावण्याचे टाळावे.
2- क्लोव्हर प्लांट– हे देखील एक शोभेची वनस्पती असून याची देखील पाने जाड व दाट असतात. अगदी झाडाखालची जागा देखील व्यापली जाते इतका दाटपणा या झाडाच्या पानांमध्ये असतो. यामुळे साप या झाडांच्या पानाखाली आरामात गुंडाळून बसतात किंवा गुपचूप आपली शिकार शोधण्यासाठी या ठिकाणी लपून बसतात. त्यामुळे चुकून देखील घराजवळ क्लोव्हर चे झाड लावू नये.
3- मोगरा– मोगऱ्याचे झाड देखील खूप दाट असते व या झाडाचा जो काही रंग असतो त्या रंगांमध्ये साप स्वतःला लपवू शकतो किंवा स्वतःला दाखवू शकतो. या झाडाजवळ साप लपून बसला व चुकून त्याला धक्का लागला तर सर्पदंश होण्याची शक्यता बळावते व याच कारणामुळे मोगऱ्याच्या झाडाजवळ साप राहण्याचा धोका जास्त असल्यामुळे त्याची देखील घराजवळ लागवड करू नये.
4- देवदाराची झाडे– हे उंच वाढणारे झाड असून मैदानी प्रदेशात बरेच वर्षे हे झाड टिकते. जास्त करून हे उंच ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढते. परंतु अधिक लोक सपाट परिसरात अथवा मैदानात देखील देवदाराची झाडे लावतात. परंतु चंदनाच्या झाडाप्रमाणे देवदाराच्या झाडात देखील साप स्वतःला गुंडाळून व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे घराजवळ देवदाराची झाडे लावू नये.
5- लिंबाचे झाड– बऱ्याचदा घराजवळ आपण लिंबाचे झाड देखील लावतो. परंतु बरेच लहान लहान कीटक व पक्षी हे लिंबाच्या झाडावर निवारा बनवतात व त्या ठिकाणी राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी सापांचे वास्तव्य कीटकांच्या शोधार्थ राहण्याची शक्यता असते. याच कारणामुळे घराजवळ लिंबाचे झाड लावू नये.