तुम्हाला माहित आहे का जगामध्ये सर्वात जास्त जमीन कोणत्या व्यक्तीकडे आहे? किती आहे त्या जमिनीचे क्षेत्र? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पृथ्वीतलावर साधारणपणे प्रत्येकच व्यक्तीची थोड्या प्रमाणात का असेना जमिनीच्या तुकड्यावर मालकी असते. साधारणपणे आपण विचार केला तर आपण ऐकले असेल की एखाद्याच्या नावावर किंवा एखाद्याच्या मालकीची जास्तीत जास्त एक हजार एकर पर्यंत जमीन असू शकते किंवा त्यापेक्षा थोडी बहुत जास्त देखील असू शकते.

परंतु जगाचा विचार केला तर कुठल्याही गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर त्यासंबंधीचे रेकॉर्ड असते. तसेच जगामध्ये देखील जमीन कोणाकडे जास्त आहे या बाबतीत एक रेकॉर्ड आहे. साधारणपणे काही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर देखील या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. प्रामुख्याने कोरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वात जास्त जमीन असलेल्या व्यक्ती कोण यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता व त्याला अनेक लोकांनी उत्तरे देखील दिली.

परंतु यामध्ये बहुतांशी लोकांनी वैयक्तिक नाव न सांगताच चीन किंवा रशिया किंवा अमेरिका अशा देशांची नावे सांगितली. परंतु एक देशाच्या नव्हे तर एखाद्या व्यक्तीच्या नावाचा विचार केला तर व्यक्तीच्या नावावर जगातील सर्वात जास्त जमीन आहे.

 जगाच्या पाठीवर कोणाकडे आहे सगळ्यात जास्त जमीन?

जगामध्ये सर्वात जास्त जमीन कोणाकडे आहे या प्रश्नाचे उत्तर जर हवे असेल तर काही संकेतस्थळे व इन्सायडर सारख्या वेबसाईटवर देखील याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार जर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहिले तर ते आहे इंग्लंड येथील शाही परिवार. इंग्लंडच्या या शाही परिवाराकडे जगातील सर्वात जास्त जमीन आहे.

जर आपण या जमिनीचा इतिहास पाहिला तर ती जमीन आधी राणी एलिझाबेथ यांच्या नावावर होती व त्यांच्या मृत्यूनंतर ती त्यांचा मुलगा व ब्रिटनचा राजा तिसरा चार्ल्स म्हणजेच चार्ल्स तृतीय याच्या नावावर झालेली आहे. परंतु या जमिनीचे एक वैशिष्ट्य आहे  आणि ते म्हणजे जरी ती जमीन त्यांच्या नावावर असली तरी देखील त्या जमिनीची ते एकटे मालक नाहीत.

जोपर्यंत ते राजा आहे तोपर्यंत ते या जमिनीचे मालक राहतील. आपण त्यांच्याकडे किती जमीन आहे याचा आकडा पाहिला तर मीडिया रिपोर्टनुसार संपूर्ण जगभरात त्यांच्या नावावर 660 कोटी एकर जमीन आहे व ही जमीन जगातील ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, आयर्लंड तसेच स्कॉटलॅड, वेल्स, कॅनडा इतर काही देशांमध्ये आहे. या जमिनीची आकडेवारी पाहिली तर त्यानुसार किंग चार्ल्स जगभरातील १६ टक्के संपत्तीवर राज्य करतात. एवढ्या मोठ्या संपत्तीची देखरेख करण्याकरिता त्यांची क्राऊन इस्टेट नावाची संस्था असून ती संपूर्ण देखभाल करते.