Land Ownership: भावांनो! तुमच्याकडे असतील ही सात कागदपत्रे, तरच तुम्ही असता स्वतःच्या जमिनीचे मालक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Land Ownership:  समाजामध्ये बऱ्याचदा आपल्याला जमिनीच्या संबंधित आणि कुटुंबांमध्ये तसेच भावा भावांमध्ये देखील अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधी कधी ते जमिनीच्या मालकी हक्काबद्दल असतात तर कधी कधी जमिनीच्या हद्दीवरून देखील बरेच वाद उद्भवतात. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात तर कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात.

काही प्रकरणे तर अशी आहेत की यामध्ये प्रत्यक्ष मालक दुसराच असतो आणि जमीन दुसराच व्यक्ती कसतो. अशावेळी नेमका जमिनीचा मालक कोण? हा प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो. त्यामुळे जमीनमालकीसाठी काही कागदपत्रे हे पुरावे म्हणून फायद्याचे ठरतात. यामध्ये जर आपण महत्त्वाच्या कागदांचा विचार केला तर सात अशी कागदपत्रे आहेत जी तुम्हाला जमिनीचे मालक असल्याचे सिद्ध करतात.

 ही सात कागदपत्रे आहेत तुमच्या जमिनीच्या मालकी हक्काचे पुरावे

1- सातबारा उतारा सातबारा उतारा हा शेत जमिनीचा एक आरसा असतो. जमिनीच्या मालकी हक्काच्या पुराव्याच्या बाबतीत जर विचार केला तर हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे? ते देखील नमूद केलेले असते. तसेच सातबारा उताऱ्यावर जमिनीची भूधारणा पद्धत देखील नमूद केलेली असते. या पद्धतीने जमिनीचा खरा मालकाची ओळख सातबारा उतारा वरून होत असते.

2- खाते उतारा किंवा आठ चा उतारा बऱ्याचदा एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागल्याची शक्यता असते. या सगळ्या गट क्रमांक मध्ये असलेल्या शेत जमिनीची माहिती हे एकत्रितपणे आठ अ म्हणजेच खाते उताऱ्यात असते. म्हणजेच गावामध्ये तुमच्या मालकीची शेत जमीन कोण कोणत्या गटात आहे  याची सर्व माहिती या उताराच्या माध्यमातून कळते.  त्यामुळे ८ चा उतारा एक महत्वाचे कागदपत्र असून जमिनीच्या मालकी हक्काच्या पुरावा करिता महत्त्वाचे आहे.

3- जमिनीचे खरेदीखत जेव्हा जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो तेव्हा संबंधित जमिनीची मूळ मालकी किंवा मूळ मालक कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी खरेदीखत खूप महत्त्वाचे ठरते. खरेदी खताला जमिनीचा मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो. आपल्याला माहित आहे की खरेदी खतामध्ये जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला आणि कोणकोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला. तसेच अगोदरचा मालक आणि आता खरेदी करून घेत असलेला मालक याबद्दलचे सगळी माहिती खरेदी खतावर असते. खरेदी खत  झाल्यानंतर संपूर्ण माहितीही फेरफार वर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाचे नोंद होत असते.

4- जमीन मोजणीचे नकाशे जमिनीच्या मालकी संदर्भात जर काही वाद उद्भवले तर जमिनीची मोजणी करायची वेळ येते. प्रामुख्याने जमिनीच्या हद्द विषयी वाद उद्भवल्यावर जमिनीचे मोजणी केली जाते. यामध्ये सदर जमिनीचे मोजणी केल्याचे नकाशे तुमच्याकडे उपलब्ध असल्यास तुमच्या त्या जमिनीवरील मालकी हक्क असल्याचे ते दयोतक आहे.

त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे व्यवस्थित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, त्या त्या शेतकऱ्यांची नावे आणि त्याच्या नावावर असलेले जमिनीचे एकूण क्षेत्र याची संपूर्ण माहिती यामध्ये असते. नाहीतर तुमच्या शेतजमिनीला शेजारी असलेल्या जमिनीचा गट क्रमांक आणि शेजारी कोणता शेतकरी आहे हे देखील तुम्हाला या माध्यमातून कळते.

5- जमीन महसूल भरल्याच्या पावत्या आपल्याला जमिनीचा महसूल प्रत्येक वर्षाला भरावा लागतो व तो तलाठ्याकडे भरल्यानंतर त्यांच्याकडून पावत्या दिल्या जातात. या महसूल भरल्याच्या पावत्या देखील जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्त्वाचा पुरावा ठरतात.

6- एखाद्या जमिनीचे पूर्वीचे खटले एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि त्या जमिनीच्या बाबतीत जर या अगोदरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा खटला किंवा केस कोर्टात असेल तर अशा केसची कागदपत्रे व त्यातील जबाबाच्या प्रती, निकालाच्या प्रत इत्यादी कागदपत्र जपून ठेवणे गरजेचे आहे. या पद्धतीचे कागदपत्रे देखील भविष्यामध्ये तुमच्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी उपयोगात येऊ शकतात.

7- प्रॉपर्टी कार्ड समजा एखादी जमीन बिगर शेती आहे व या जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर अशा ठिकाणी बिगर शेती जमिनीवर जर तुमचा मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर यासाठी लागणारा महत्त्वाचा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय. अगदी सातबारा उताऱ्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती शेतजमीन आहे यासारखी माहिती या प्रॉपर्टी कार्डवर असते. किती जमीन बिगर शेती आहे हे देखील प्रॉपर्टी कार्ड च्या माध्यमातून कळते.

 त्यामुळे ही सात कागदपत्रे अवश्य सांभाळून ठेवावेत