LIC Jeevan Kiran: एलआयसीची नवीन पॉलिसी जीवनात आणेल प्रकाश! मिळतील हे फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Jeevan Kiran:- विमा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असून भविष्यकाळामध्ये येणाऱ्या अनेक संकटांमध्ये आर्थिक आधार देण्याचे काम विम्याच्या माध्यमातून होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या विमा योजनांमध्ये बरेच जण गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना प्रत्येकाला  वाटते की आपली कष्टाने केलेली बचतीची गुंतवणूक ही सुरक्षित रहावी व या दृष्टिकोनातूनच गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. 

गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या आणि विम्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी हे एक विश्वासाचे ठिकाण असून एलआयसीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आकर्षक पॉलिसी लॉन्च केलेल्या असून याचा फायदा बऱ्याच जणांना होत आहे.

अनेक आकर्षक परतावे तसेच विमा सुरक्षा या वेगवेगळ्या पॉलिसींच्या माध्यमातून एलआयसी पुरवत असते. अगदी त्यापद्धतीने जर आपण विचार केला तर नुकतीच भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसी ने  नवी विमा योजना लॉन्च केली असून या पॉलिसीचे नाव आहे जीवन किरण पॉलिसी होय. नोकरी पेशा व्यक्तींसाठी ही योजना खूप  योग्य असून ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे अशा व्यक्तींकरिता ही योजना महत्त्वाचे ठरणार आहे.

 कशा पद्धतीचे आहे जीवन किरण पॉलिसीचे स्वरूप?

नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण असून जीवन किरण पॉलिसीच्या मुद्दत संपण्याअगोदर जर विमाधारकाचा अकाली मृत्यू झाला तर ही योजना कुटुंबाला योग्य प्रकारे आणि चांगली आर्थिक मदत देते. महत्वाचे म्हणजे मुदतपूर्ती दरम्यान तुम्ही जी काही प्रीमियमची रक्कम भरलेली असेल ती देखील तुम्हाला परत मिळते. नुकतीच ही विमा योजना लागू करण्यात आलेले असून या योजनेच्या प्लॅनमध्ये धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणारे या दोघांसाठी वेगवेगळे प्रीमियमचे दर ठेवण्यात आलेले आहेत.

 विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किती रक्कम मिळेल?

एखाद्या विमाधारकाने पॉलिसी घेतल्यानंतर जर मुदत संपण्या अगोदर नमूद केलेल्या तारखेच्या अगोदर जर विमा धारकाचा पॉलिसी मुदतीमध्येच मृत्यू झाला तर या योजनेच्या माध्यमातून मृत्यू वरील विम्याची रक्कम दिली जाणार आहे. विमा धारकाचा जर नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू झाल्यास वार्षिक प्रीमियमच्या सातपट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेले एकूण प्रीमियमच्या 105% किंवा मूळ विमा रक्कम  दिली जाणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत सिंगल प्रीमियमच्या 125% मृत्यूनंतर भरले जाणार असून याशिवाय मूळ विमारक्कम देखील दिली जाणार आहे.

 या पॉलिसीचे अन्य वैशिष्ट्ये

या पॉलिसी अंतर्गत कमीत कमी मूळ विमा रक्कम 15 लाख रुपये आहे आणि जास्तीत जास्त मूळ विमा रकमेवर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. या पॉलिसीची कमीत कमी मुदत 10 वर्ष आणि जास्तीत जास्त मुदत 40 वर्षाची आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य  म्हणजे तुम्हाला एकरकमीदेखील प्रीमियम भरता येणार आहे. तसेच या व्यतिरिक्त मासिक, त्रीमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम देखील भरू शकतात.