Lonavala Tourism : लोणावळ्याला पिकनिकला जाण्याचा प्लान आहे का? परंतु अगोदर ‘हे’ वाचा

lonavala

Lonavala Tourism:  पावसाळ्याच्या अल्हाददायक वातावरणामध्ये आणि पसरलेली हिरवाई पाहत बरेच जण मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत ट्रीप प्लान करतात. कारण या दिवसांमध्ये दैनंदिन कामाच्या ताणातून वेळ काढून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना किंवा डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला खूप मजा येते. परंतु बऱ्याचदा काही पर्यटक अतिउत्साहीपणामुळे नको ते धाडस करतात. या अतिधाडसामुळे बऱ्याचदा जीवावर बेतते.

तसेच या दिवसांमध्ये बऱ्याच पर्यटन स्थळांवर प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते व अशा ठिकाणी असलेल्या अनेक पॉईंटवर सेल्फी काढण्याच्या नादामध्ये देखील जीव गमावण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना आपल्या जीविताला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते. महाराष्ट्रातील जर पर्यटन स्थळांचा विचार केला तर लोणावळा हे ठिकाण एक निसर्गरम्य ठिकाण असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते.

परंतु या पर्यटकांमध्ये काही साहसी आणि हौशी पर्यटक असतात जे कित्येकदृष्टीने स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. लोणावळ्याचा विचार केला तर या ठिकाणी असलेल्या भुशी डॅम वर देखील मोठ्या प्रमाणावर या दिवसांमध्ये पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी जीवावर बेतणारे स्टंट काहीजण करतात व त्यामुळे दुर्घटना घडण्याला आपोआपच निमंत्रण मिळते आणि अशा दुर्घटनांमध्ये मृत्यू देखील ओढवतो. त्यामुळे या ठिकाणी येताना पर्यटकांनी आततायीपणा न करता स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून देखील करण्यात येत आहे.

 पोलिसांकडून काय आवाहन केले जात आहे?

पर्यटकांची पंढरी असे म्हटल्या जाणाऱ्या लोणावळ्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटनासाठी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता यावा म्हणून याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणावर यायला उत्सुक असतात. परंतु यामध्ये बरेच जण पर्यटनाचा दृष्टिकोन बाजूला सारत नको त्या गोष्टी करतात व आपला जीव धोक्यात घालतात.

खास करून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पुणे व मुंबईकर मोठ्या प्रमाणावर येत असतात. लोणावळा या ठिकाणी असलेल्या भुशी डॅम वर पर्यटकांचे खूप मोठी गर्दी होते. परंतु बरेच नागरिक नको त्या गोष्टी करतात व जीवावर देतील असे स्टंट करत असतात व यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्घटना होतात व परिणामी जीव जातो. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी व कुठल्याही प्रकारचा हुल्लडपणा करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसे पाहायला गेले तर प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जातात.  याच अनुषंगान अशा ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात केलेला असतो.

 पोलिसांनी पर्यटकांसाठी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

यामध्ये पर्यटकांना पोलिसांकडून आवाहन केले जात आहे की, पर्यटकांनी जीवावर बेतेल असं कुठल्याही प्रकारचे कृत्य करू नये तसेच पर्यटनाच्या ठिकाणी मद्यपान  करू नये. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांची होणारी गर्दी पाहता वाहने पार्किंग करताना ते नो पार्किंग झोन मध्ये किंवा रस्त्यावर लावू नयेत. लोणावळ्याचा विचार केला तर या ठिकाणी मोठमोठे धबधबे असल्यामुळे धबधब्यांखाली आनंद घेताना काळजी घ्यावी व  धबधब्याच्या वरच्या बाजूने चढू नये.

सेल्फी, फोटो किंवा व्हिडिओ काढताना देखील योग्य ती काळजी घ्यावी. बऱ्याचदा धबधब्यांची उंची खूप मोठी असते व अशा ठिकाणी काही तरुण-तरुणी व्हिडिओ काढण्याकरिता नको त्या ठिकाणी पोहोचतात त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलीस कारवाई केली जाईल. तसेच या ठिकाणी मद्यपान करून कुठल्याही प्रकारचा धिंगाणा रस्त्यांवर घालू नये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पर्यटनाच्या ठिकाणी आलेल्या महिला वर्गाला कुठला त्रास होईल अशा पद्धतीचे वर्तन करू नये व याची काळजी घ्यावी. अशा पद्धतीचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe