Maharashtra Government : महाराष्ट्रातील ह्या नागरिकांना प्रतिकुटुंब दिले जाणार दहा हजार रुपये ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Ajay Patil
Published:

Government Decision:- राज्यामध्ये सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी शेतीची, तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे देखील नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी याकरिता राज्य शासनाने दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या मदतीचे जर साधारणपणे आपण स्वरूप पाहिले तर प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदत दिली जाणार असून जर यामध्ये दुकानदार किंवा टपरी धारक असतील त्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांना देखील आता या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. महत्वाची म्हणजे ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर 2023 या चालू पावसाळ्यामध्ये होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती करिता देण्यात येणार आहे. नेमके कशा पद्धतीचे असेल या मदतीचे स्वरूप याबद्दलची माहिती घेऊ.

प्रति कुटुंब दिले जाणार दहा हजार रुपये
या नैसर्गिक आपत्तीमध्ये जर घर पाण्यात बुडालेले असेल किंवा घर पूर्णपणे वाहून गेले असेल किंवा यामध्ये घराची पडझड पूर्णपणे झाली असेल तर कपड्यांच्या नुकसानिकरीता यामध्ये प्रती कुटुंब 2500 रुपये तसेच घरगुती वापराचे भांडे यांच्या नुकसानेकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये असे साधारणपणे मदतीचे सध्याचे स्वरूप आहे. परंतु यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करण्यात आली असून आता ही रक्कम दुपटीने वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता कपड्यांचे तसेच घरगुती भांडीकुंडी यांचे नुकसानी करिता दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

दुकानाच्या नुकसानीकरिता 50 हजार रुपये
नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत दुकानांचे नुकसान झाल्यास कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळत नव्हता. परंतु आता ही बाब डोळ्यासमोर ठेवून त्यांनाही आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. या अंतर्गत आता दुकान पाण्यामध्ये बुडालेले असेल किंवा पूर्णपणे वाहून गेले असेल

किंवा दुकानाचे संपूर्णपणे यामध्ये नुकसान झाले असेल तर अशा दुकानदारांना झालेल्या पंचनामाच्या आधारे नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. परंतु यामध्ये महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी किंवा स्थानिक मतदार यादीत नाव असलेले आणि जे रेशन कार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकीच अधिकृत दुकानदारांना ही मदत दिली जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

टपरीधारकांना मिळेल दहा हजाराची मदत
यामध्ये आता दुकानदारच नाही तर टपरी धारकांना देखील आर्थिक मदत केली जाणार आहे. अशा टपरीधारकांना देखील आता पंचनामाच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीचे 75 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये पर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत तिचा हात देण्यात येणार आहे. याकरिता देखील जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे मतदार यादीत नाव आहे व जे रेशन कार्डधारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत परवानाधारक टपरीधारकांना मदत देण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe