Mobile Network Tips : घरामध्ये मोबाईलला नेटवर्क येत नाही? वापरा ट्रिक आणि घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात मिळवा नेटवर्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mobile Network Tips: मोबाईलचा वापर हा आता लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण करू लागले आहेत. मोबाईल हे साधन आता जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसले असून एक मिनिटाचा रिकामा वेळ जरी व्यक्तीला मिळाला तरी त्याच्या हातात मोबाईल असतो व तो काहीतरी मोबाईल मध्ये बघतच असतो.

परंतु आपल्याला माहित आहे की मोबाईलचा विचार केला तर यामध्ये तुम्ही ज्या कंपनीचे सिम वापरतात त्या कंपनीचे नेटवर्क खूप महत्त्वाचे असते. जर मोबाईल ला नेटवर्क नसेल तर मोबाईल असून तो काही कामाचा नसतो. अगदी निरुपयोगी असा ठरतो. मोबाईल नेटवर्कच्या बाबतीत महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच ठिकाणी घरामध्ये काही ठिकाणी व्यवस्थित नेटवर्क येते तर काही ठिकाणी नेटवर्क येत नाही.

त्यामुळे खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. ही समस्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये येते. जर तुम्हाला देखील तुमच्या घरामध्ये ही समस्या येत असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. या लेखामध्ये चार ट्रिक दिल्या असून याचा वापर जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये कुठेही नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही.

 वापरा या चार ट्रिक आणि घरात मिळवा नेटवर्क

1- काचेचा ग्लास ही ट्रिक जरा वाचायला किंवा ऐकायला देखील वेगळी वाटेल. परंतु या क्षेत्रातील बऱ्याच तज्ञांनी अशा प्रसंगी ही ट्रिक वापरण्याचे सांगितले आहे. यामध्ये प्रामुख्याने जर तुमच्या मोबाईलला घरामध्ये कुठेच नेटवर्क येत नसेल तर तुमचा फोन एका काचेच्या ग्लासमध्ये ठेवा त्यानंतर मोबाईलला काही प्रमाणामध्ये नेटवर्क मिळते.

2- सिग्नल बूस्टरचा वापर ही ट्रिक थोडी खर्चिक असून जर इतर काही उपायांनी जर नेटवर्कची समस्या सुटत नसेल तर तुम्हाला सिग्नल बूस्टर हा उपाय फायद्याचा ठरतो. हे एक नेटवर्क बूस्टर नावाचे डिवाइस असून ते बाजारात तुम्हाला मिळते. हे घरात बसवल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये कोणत्याही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध होते. साधारणपणे तुम्हाला घरात नेटवर्क बूस्टर बसवण्याकरिता दोन हजार रुपयांचा खर्च करावा लागतो.

3- फोनची सेटिंग तपासणे गरजेचे बऱ्याचदा घरामध्येच नाहीतर बऱ्याच ठिकाणी  नेटवर्कची समस्या उद्भवते. अशावेळी तुम्ही तुमच्या फोनची सेटिंग चेक करून घेणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये 2जी किंवा 3 जी नेटवर्कची सेटिंग सुरू केली असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नेटवर्क मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनची सेटिंग तपासून त्याची नेटवर्क सेटिंग 4 जी किंवा 5 जी करून घेणे गरजेचे आहे.

4- वापरत असलेल्या कंपनीच्या सिम ऐवजी दुसऱ्या कंपनीचे सिम बदलणे या प्रकारामध्ये तुम्ही ज्या कंपनीचे सिम कार्ड वापरता त्या कंपनीचे मोबाईल टॉवर तुमच्या गावाजवळून किंवा घरापासून खूप दूर असेल तर यामुळे देखील तुमच्या घरामध्ये नेटवर्क न येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुमच्या परिसरात किंवा तुमच्या घराच्या जवळ कुठल्या कंपनीचे मोबाईल टॉवर जवळ आहे त्याच कंपनीचे सिम कार्ड टाकून घेणे फायद्याचे ठरते. किंवा तुमचा आहे तो नंबर दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्टेबल करून घेणे फायद्याचे ठरते.