Monsoon Update : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे मान्सूनची लवकरच केरळात आगमन होणार असल्याचा अंदाज समोर आला आहे.
मान्सून केरळात येत्या 48 तासात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे तत्पूर्वी देशातील काही भागात मान्सूनपूर्व सरी बरसणार असा अंदाज आहे. तीन आणि चार जून 2023 रोजी गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! यंदा विदर्भात होणार शंभर टक्के पाऊस; तुमच्या जिल्ह्यात कसा राहणार पाऊस? वाचा…..
एकंदरीत आता 48 तासात मान्सून केरळात येणार असल्याने मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब राहणार आहे. खरं तर भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या मान्सूनच्या अंदाजात मान्सूनचे आगमन 4 जूनला केरळात होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यानुसार आता येत्या 48 तासात तो केरळात दाखल होणार आहे. म्हणजेच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरेल असं सांगितलं जात आहे. यामुळे आता महाराष्ट्रात मान्सूनचं केव्हा आगमन होणार? यासंदर्भात देखील शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
खरंतर मानसून केरळात पोहोचल्यानंतर तेथून सात ते आठ दिवसात तळ कोकणात दाखल होत असतो. यामुळे यंदा देखील तशीच परिस्थिती कायम राहणार असे चित्र आहे.
यामुळे महाराष्ट्रात मान्सून 10 ते 12 जून दरम्यान दाखल होईल असे सांगितले जात आहे. दरम्यान, मान्सून आगमनाची तारीख जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पूर्व आवश्यक पूर्वतयारीच्या कामाचा वेग वाढवला आहे.
शेतकऱ्यांनी रोटर मारून जमिनी तयार केल्या आहेत. काही भागात कापूस लागवड सुरु झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कापूस लागवड आता सुरु केली आहे.
हे पण वाचा :- खरीपात तुरीच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार !