सातबारा उतारा काढा तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये ! सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला स्पेशल गिफ्ट…

Ajay Patil
Updated:

सातबारा उतारा हा जमिनीच्या बाबतीत एक महत्त्वाचे कागदपत्र असून सातबारा उताऱ्याला जमिनीचा आरसा असे म्हटले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातबारा उताऱ्यावर जमिनीचे सर्व महत्त्वाच्या नोंदी असतात. शेतकऱ्यांशी अगदी जवळचे असणारे कागदपत्र म्हणून देखील सातबारा उताऱ्याकडे पाहिले जाते. सातबारा उतारा मध्ये शासनाकडून अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. अगोदर हस्तलिखित स्वरूपामध्ये सातबारा मिळायचा परंतु आता डिजिटल स्वरूपामध्ये सातबारा मिळू लागला आहे.

असे बऱ्याच प्रकारचे बदल सातबारा उताऱ्यावर शासनाकडून करण्यात आलेले आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण पाहिले तर आता सातबारा उतारा तुम्हाला तब्बल 24 भाषांमध्ये मिळू शकणार आहे.  याचे फायदे देखील बरेच असून देशातील पहिला प्रयोग हा महाराष्ट्र मध्ये राबवण्याला सुरुवात झाली आहे.

 सातबारा मिळणार 24 भाषांमध्ये

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, सातबारा उतारा आता मराठी भाषेसोबतच इतर 24 भाषांमध्ये देखील मिळणार आहे व देशातील पहिला प्रयोग आता महाराष्ट्रात राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. जर आपण राज्याचा विचार केला तर दोन कोटी 65 लाख सातबारा उतारे असून यातील चार कोटी खातेदार आहेत. तसेच जे काही सातबारा उतारे उपलब्ध आहेत त्यापैकी दोन कोटी 58 लाख उताऱ्यांवर फेरफार नोंदी सह अन्य नोंदी देखील घेतल्या जात आहेत.

आपण भारताचा विचार केला तर महाराष्ट्रासोबतच तामिळनाडू, मध्यप्रदेश तसेच बिहार व पंजाब आणि गुजरात इत्यादी राज्यातील नागरिकांचे वास्तव्य हे एकमेकांच्या राज्यात बऱ्याच ठिकाणी दिसून येते. खास अशा व्यक्तींकरिता ही सुविधा खूप महत्त्वाची ठरणार आहे. या अगोदर अनेक राज्यांमध्ये त्या त्या राज्याच्या भाषेतून सातबारा दिला जात होता. साधारणपणे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक नागरिक हे इतर राज्यांमध्ये देखील जमिनीचे व्यवहार करतात किंवा जमिनी घेतात.

परंतु सातबारा उतारा त्या त्या राज्यातील भाषेत मिळत असल्यामुळे अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे याबाबतीत महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. याकरिता जमाबंदी आयुक्तालयाने सीडॅक्स संस्थेकडून ट्रान्सलेशन टूल किट विकसित केले असून सातबारा उतारा संबंधित भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचा असेल तर जशाच्या तशाच शब्दांसह शब्द लिखाण करून त्याचे अनुवादन करण्यात आले आहे. हे दोन्ही प्रकारचे टूलकिट वापरल्यामुळे आता सातबारा उताऱ्यातील मजकूर जसाचा तसा उपलब्ध झाला आहे व त्याचे भाषांतर झाल्यामुळे त्यातील काही समस्या देखील दूर झाले आहेत.

 या 24 भाषेत उपलब्ध असणार आता सातबारा

सातबारा उतारा आता मराठी, हिंदी,इंग्रजी बंगाली,गुजराती,मल्याळम,तेलुगु,तामिळ,कन्नड ओरिया,उर्दू,असामी,मणिपुरी,नेपाळी,कोकणी,मैथिली,डोगरी,बोडो,संथाली,सिंधी,संस्कृत,काश्मिरी,अरोबिक काश्मिरी आणि पंजाबी इत्यादी भाषांमध्ये आता उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe