आता नाही टेन्शन! 1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार उतारे पाहता येतील तुमच्या मोबाईलवर, कसे ते वाचा……

Ajay Patil
Published:
land record department

जमीन आणि जमिनीचे व्यवहार हा मुद्दाच प्रामुख्याने खूप संवेदनशील असल्यामुळे यासंबंधीची सगळी कागदपत्रे यांना खूप महत्त्व आहे.  कारण बऱ्याच दिवसापासून जमिनीचे अनेक मालक बदललेले असतात व त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. नाहीतर उगीचच आर्थिक फसवणूक होण्याचा व त्यामुळे मानसिक त्रास होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.

त्यामुळे नाहक मग वाद उद्भवतात आणि कोर्ट कचेरीच्या दारात असे वाद गेल्यामुळे वेळ तर जातोच परंतु प्रचंड प्रमाणात पैसा देखील खर्च होतो. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहार करण्याअगोदर संबंधित जमिनीच्या संदर्भात सगळी माहिती तुम्ही काढणे गरजेचे आहे व ही माहिती तुम्हाला फक्त त्या जमिनीचे फेरफार, सातबारा आणि खाते उतारा या माध्यमातूनच मिळू शकते.

आता तुम्ही म्हणाल की जुन्या वर्षाचे रेकॉर्ड आणि त्या रेकॉर्ड मधून कागदपत्रे कसं काय काढायचे आणि कुठे शोधायची? परंतु याबाबत आता कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नसून  1880 सालापासूनचे सगळे रेकॉर्ड महसूल आणि भूमि अभिलेख कार्यालयात उपलब्ध असल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आता ही सगळी माहिती किंवा ही सगळे कागदपत्रे आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ही कागदपत्रे सहजपणे मिळवू शकतात. या लेखामध्ये आपण ही कागदपत्रे कशी मिळवायची याबद्दलची माहिती घेऊ.

 तुमच्या मोबाईलवर अशा पद्धतीने काढा 1880 सालापासूनचे फेरफार उतारे आणि महत्त्वाची कागदपत्र

1- याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असे सर्च करणे गरजेचे आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.

2- या ओपन झालेल्या पेजवर ई रेकॉर्ड्स पाहण्याकरिता तुम्हाला रेकॉर्ड्स या पर्यायावर जावे लागेल व त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

3- त्या पेजच्या उजवीकडील असलेल्या भाषा या पर्यावर क्लिक करून तुमची भाषा निवडावी.

4- त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटीमध्ये लॉगिन व मदत असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. जर तुम्ही अगोदरच या संकेतस्थळावर तुमची नोंदणी केली असेल तर तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून या साइटवर जाऊ शकतात. परंतु जर तुम्ही नोंदणीच केली नसेल तर तुम्ही नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.

5- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची सगळी पर्सनल म्हणजेच वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी.

6- तसेच तुम्ही कोणता व्यवसाय करता व तुमचा मेल आयडी, जन्मतारीख इत्यादी पर्सनल माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्याविषयीचे रकाने भरून घ्यावे.

7- तसेच लॉगिन आयडी तयार संकेतस्थळाच्या निर्देशानुसार लॉगिन आयडी तयार करावा व दिलेल्या निर्देशानुसार पासवर्ड टाकून घ्यावा.

8- त्यानंतर चौकटीमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्यातील कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर द्यावे त्यानंतर चौकटीत दिलेली अक्षरे जशीच्या तशी कॅपच्या या चौकटीत टाईप करावी व शेवटी सबमिट बटन दाबावे.

9- या प्रक्रियेनंतर तुमची वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करावे व लॉगिन करण्यासाठी असा मेसेज येईल व त्यावरील इथे क्लिक करा वर क्लिक करा.

10- रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे युजरनेम आणि पासवर्ड टाकला असेल तो परत लॉगिन करण्यासाठी वापरा.

 आता तुम्हाला अशा पद्धतीने पाहता येईल फेरफार उतारा

1- या ठिकाणी दिलेल्या जिल्ह्यांपैकी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा तसेच पुढे तुम्ही राहत असलेला तालुका तसेच गावाचे नाव व फेरफार उतारा, सातबारा आणि आठ अ उतारा इत्यादी प्रकारचे जवळजवळ 58 अभिलेखांचे प्रकार यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत.

2- त्यानंतर संबंधित जमिनीचा गट क्रमांक टाकावा व सर्च म्हणजे शोध या पर्यायावर क्लिक करावे.

3- त्यानंतर तुम्ही ज्या जमिनीचा गट क्रमांक टाकला आहे त्या जमिनीच्या संबंधित फेरफारशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसते.

4- तुम्हाला सदर जमिनीचा कुठल्या वर्षाचा फेरफार पाहायचा आहे त्याचे वर्ष व क्रमांक या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार पाहिजे आहे त्यावर क्लिक करून तुम्ही त्या वर्षाचा फेरफार पाहू शकता.

5- त्यानंतर प्रिव्हू कार्ट म्हणजेच पुनरावलोकन कार्ट या पर्यावर क्लिक करावे व त्यानंतर तुमचे कार्ट ओपन होते व त्याखाली पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सारांश हे पेज ओपन होते व इथे तुमच्या फाईलची स्टेटस तुम्हाला मिळते.

6- यानंतर तुम्ही समोरील फाईल पहा या पर्यावर क्लिक केलं की तुमचे जमिनीचे फेरफार पत्रक तुमच्यासमोर ओपन होते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe