Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 1 कोटी मिळवू शकतात, कस ते वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme :- गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्ती केलेली गुंतवणूक आणि त्या माध्यमातून मिळणारा परतावा याचा बहुतांश विचार करून गुंतवणूक करतात. तसेच गुंतवणूक ही सुरक्षित राहणे याला प्रथम प्राधान्य गुंतवणूकदार देत असतात. गुंतवणुकीचे विविध पर्याय असून ज्या ठिकाणी गुंतवणूक सुरक्षित राहील आणि परतावा जास्त मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात.

गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सरकारच्या देखील अनेक योजना आहेत. परंतु या व्यतिरिक्त बरेच जण शेअर बाजार तसेच म्युच्युअल फंड यासारख्या पर्यायांची निवड करतात. परंतु या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक देखील खूप फायद्याची असते. या दृष्टिकोनातून आपण पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना अर्थात पीपीएफ योजनेविषयी महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 पीपीएफ योजनेत गुंतवणूक करून मिळवू शकतात एक कोटी रुपये

गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या सुरक्षित असून चांगले परतावा देखील देतात. अशीच पोस्ट ऑफिसची एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना होय. या योजनेमध्ये तुम्ही अगदी थोडी रक्कम गुंतवणूक केली तरी देखील तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. सध्या या योजनेच्या माध्यमातून गुंतवणुकीवर 7.1% व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये तुम्हाला खाते उघडवायचे असेल तर तुम्ही पाचशे रुपयांमध्ये ते उघडू शकतात व जास्तीत जास्त वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

गुंतवणुकीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला पीपीएफ खात्यामध्ये जर साडेबारा हजार रुपये जमा केले तर तुम्हाला परिपक्वता कालावधीनंतर म्हणजेच मॅच्युरिटी वर एकूण 40.68 लाख रुपये मिळतात. या योजनेतील खाते पंधरा वर्षात परिपक्व होते. परंतु तुम्ही मॅच्युरिटीनंतर देखील ते पाच पाच वर्षांसाठी वाढवू शकतात. साधारणपणे तुम्ही एकूण 25 वर्षाकरिता या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेमधून तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते तुम्हाला 15, वीस आणि पंचवीस वर्षांनी काढता येतात.

 पाच वर्षे पैसे काढता येत नाहीत

या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे पीपीएफ खाते उघडल्यानंतर पुढील पाच वर्षापर्यंत तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म दोन भरून या खात्यातून पैसे काढू शकतात. समजा तुम्ही खाते उघडण्याच्या पंधरा वर्षांपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला एक टक्क्यांचा दंड भरावा लागतो.

 या योजनेत कोणाला खाते उघडता येते?

पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. हे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आपल्या नावाने उघडता येते. तसेच अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने खाते उघडायचे असेल तर अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीला देखील हे खाते उघडता येते.

तुम्हाला जर पीपीएफ योजनेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ते उघडू शकतात. तुमच्या मुलासाठी उघडायचे असेल तर ते तुमच्या नावाने उघडता येईल. परंतु हिंदू अविभक्त कुटुंबाच्या अर्थात एचयुएफच्या नावाने पीपीएफ खाते उघडता येत नाही.

 या योजनेतून एक कोटी रुपये कसे मिळू शकतात?

यासाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक पंचवीस वर्षे ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला सध्याच्या 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने 65.58 लाख रुपयांचे व्याजासह  एकूण 37.50 लाख रुपये जमा करून परिपक्वतेवर 1.03 कोटी रुपये मिळतात.