एक आठवड्यात चांद्रयानने काय केले चंद्रावर? जगाच्या फायद्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोणत्या गोष्टी केल्या? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चांद्रयान 3 मोहीम ही भारताची अतिशय महत्त्वकांक्षी असलेली मोहीम होती व ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. चंद्रयान तीन मोहीम ही अनेक अंगाने महत्वपूर्ण होती. कारण आतापर्यंत जगातील कुठलाच देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकलेला नाही. परंतु भारताने ही किमया करून दाखवली व जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले गेले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 14 दिवस सूर्यप्रकाश असतो व एवढ्याच कालावधीमध्ये चंद्रयान तीनला  त्या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण अभ्यास करायचा आहे. याकरिता प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर यांच्या मदतीने हा सगळा अभ्यास केला जाणार आहे. साधारणपणे 23 ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी  चंद्रयानने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केले. आता याला जवळपास एक आठवडा पूर्ण झाला असून या कालावधीमध्ये विक्रम लेंडर आणि प्रज्ञान रोव्हरने त्या ठिकाणी नेमके काय शोध लावलेत हे आपण बघणार आहोत?

 एका आठवड्यातली प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लॅन्डरची कामगिरी

चंद्रयान तीनने एक आठवडा पूर्ण केला असून यादरम्यान विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने अनेक महत्त्वाच्या बाबींवर या ठिकाणी काम केले असून अनेक नवनवीन गोष्टी जे जगाच्या फायद्याच्या ठरू शकतील अशा समोर आल्या आहेत. या दरम्यान ज्या काही गोष्टी या माध्यमातून समोर आल्या त्यातून भविष्यामध्ये चंद्रावर मानवी वसाहती उभ्या राहू शकतील या दृष्टिकोनातून मदत होणार आहे.

यामध्ये पहिली बाब अशी की प्रज्ञान रोहन 29 ऑगस्ट 2023 ला अतिशय महत्त्वाची बाब उघड केली व ती म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशामध्ये ऑक्सिजन आहे हे जगाला कळले. हे जे महत्वपूर्ण काम करण्यात आले ते पेलोड या उपकरणाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. पेलोडच्या माध्यमातून चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे त्यावर खनिजे आणि काही रसायने आहेत का याचा शोध व अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने पाठवण्यात आले आहे.

तसेच पेलोड हे चंद्राच्या पृष्ठभागावर प्रखर असे लेझर किरण टाकते व त्यातून बाहेर पडणारा जो काही प्लाझ्मा असतो त्याचे विश्लेषण करते. हे जे लेझर किरण असतात ते अत्यंत तीव्र गतीने दगड किंवा मातीवर पडतात व त्या ठिकाणी अतिशय गरम स्वरूपाचा प्लाजमा तयार होतो. नेमके या उत्सर्जित प्लाझ्मा मधून जो काही प्रकाश उत्सर्जित होतो तो पृष्ठभागावर कोणत्या प्रकारची खनिजे किंवा रसायने आहेत याची माहिती देत असतो.

चंद्रावर ऑक्सिजन सापडणे हा एक चंद्रयान तीन चा महत्वपूर्ण शोध असून हायड्रोजनचा शोध अद्याप देखील सुरू आहे. कारण ऑक्सिजन सोबत जर हायड्रोजन सापडले तर त्या ठिकाणी पाणी मिळू शकते. जर पाणी मिळाले तर त्या ठिकाणी  मानवी वसाहत उभारणे शक्य होणार आहे कारण मानवाला जगण्याकरिता प्रामुख्याने पाणी आणि ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्याच बाबीचं चंद्रावर राहिल्या तर चंद्रावर जीवन प्रस्थापित करणे देखील शक्य होणार आहे. तसेच यामध्ये विक्रम लेंडरने देखील चांगली कामगिरी केली असून यामध्ये थर्मामीटर बसवण्यात आलेले आहेत.

यास थर्मामीटर च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचा जो काही वरचा भाग आहे त्यावरील तापमान आणि पृष्ठभागाच्या दहा सेंटिमीटर खाली असलेल्या भागातील तापमानामध्ये खूप मोठा फरक आहे व हे देखील विक्रम लॅन्डरला जोडलेल्या chaSTE पेलोडच्या माध्यमातून कळले. या माध्यमातून चंद्राच्या वरच्या भागाचे तापमान हे 50 ते 60 अंश सेल्सिअस आहे तर जमिनीच्या चार इंच खाली चक्क मायनस दहा अंश सेल्सियस आहे.

हे देखील या माध्यमातून कळले. कारण तापमानाचा केलेला हा अभ्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर मानवी वस्ती उभारायचे ठरवले तर ते नेमके कोणत्या ठिकाणी उभारायची किंवा स्थापन करायची आणि त्या ठिकाणी सेटल कसे करावे आणि महत्वाचे म्हणजे मानवासाठी आवश्यक तापमानातील बदल योग्य कसा ठेवता येईल याकरिता मदत होणार आहे.

 चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची खात्री

तसेच महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर चे अस्तित्व आहे हे देखील जवळजवळ सिद्ध झाले आहे. आपल्याला माहित आहेच की हे एक पिवळ्या रंगाचे केमिकल असून पाण्यात ते विरघळत नाही. सोने आणि प्लॅटिनम धातू वगळता सर्व धातूंवर प्रतिक्रिया सल्फर देते व त्यामुळे सल्फाईड तयार होतात.

सल्फर चा उपयोग पाहिला तर तो कारच्या बॅटरी, खत कारखाने तसेच ऍसिड, तेल शुद्धीकरण व पाणी शुद्धीकरण कारखाने आणि महत्त्वाचे म्हणजे खनिजांचे उत्खनन करण्यासाठी होत असतो. त्या ठिकाणी सल्फर सापडल्यामुळे मशिनरीच्या साह्याने आता या सर्व बाबी चंद्रावर शक्य आहेत.

 चंद्रावर कॅल्शियम पुरेसा आहे

चंद्रावर कॅल्शियमचे प्रमाण देखील पुरेशे आहे. आता कॅल्शियम चा उपयोग पाहिला तर तो अनेक वैद्यकीय उत्पादनांमध्ये केला जाऊ शकतो. कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करून सिमेंट बनवता येणे शक्य आहे तसेच टूथपेस्ट मध्ये देखील कॅल्शियम वापरले जाते. याशिवाय औषध तसेच अन्न, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आणि साबण बनवण्यात देखील कॅल्शियमची मदत होऊ शकते.

 चंद्राच्या पृष्ठभागावर लोह सापडल्याची पुष्टी

महत्वाचे म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर लोह सापडल्याचे देखील पुष्टी झाली असून हा एक महत्त्वाचा घटक असून प्रत्येक जीवासाठी आणि मानवासाठी तो महत्त्वाचा आहे. लोह हे आपल्या रक्तात देखील असते. तसेच कार आणि जहाजे, विमाने बनवण्याकरिता देखील लोहचा वापर केला जातो.

 टायटॅनियम हा धातू चंद्रावर आढळतो

टायटॅनियम हा सर्वात मजबूत आणि कमी वजनाचा धातू असून तो चंद्रावर आढळून येतो. त्याचा वापर प्रामुख्याने हेलिकॉप्टर तसेच विमाने बनवण्याकरिता केला जातो व बुलेटप्रूफ जॅकेट आणि आर्मर प्लेटिंगमध्ये टायटॅनियम चा वापर होतो. नौदलातील जहाजे तयार करण्याकरिता देखील याचा वापर होतो. क्रीडा साहित्य व वैद्यकीय तसेच रसायन उद्योगामध्ये देखील हा धातू महत्त्वाचा आहे.

 मॅगनीज चंद्रावर आढळते

औद्योगिक आणि जैविक वापराच्या दृष्टिकोनातून मॅग्नीज खूप महत्त्वाचा धातू असून तो चंद्रावर सापडतो. मानवी शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण तसेच ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये देखील मॅगनीज ची मदत होते. काच तसेच रंगद्रव्य आणि बॅटरी बनवण्याकरिता देखील याचा वापर होतो.

 सिलिकॉन देखील चंद्रावर सापडते

सिलिकॉन चंद्रावर सापडते व हा बांधकाम उद्योग तसेच सिमेंट उद्योगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मातीची भांडी तयार करणे तसेच ब्रेस्ट इम्प्लांट आणि त्याप्रमाणेच बॉडी इप्लांट बनवणे तसेच डोळ्यांची लेन्स, इलेक्ट्रिकल स्टील बनवणे व ऑटोमोबाईल उद्योगासाठी आवश्यक असलेले सिल्युमिन तयार करण्यासाठी सिलिकॉनचा वापर होतो.