Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दशकात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत ही वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा रस्ता तयार केला जाणार आहे. दरम्यान या रस्त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरं तर या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या जमिनीची मूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती.
मात्र, बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीला कमी दर मिळत असल्याचा आक्षेप घेतला. यामुळे या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या जमिनीच्या फेर मूल्यांकन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यात. सुरुवातीला या प्रकल्पासाठी गेल्या तीन वर्षातील जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार गृहीत धरून मूल्यांकन करण्यात आले होते.
मात्र संबंधितांनी यावर आक्षेप नोंदवल्यानंतर गेल्या पाच वर्षातील जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार गृहीत धरून फेरमूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे. यानुसार आता पश्चिम भागातील रिंग रोडचे फेरमुल्यांकन पूर्ण झाले आहे.
हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज
मात्र पूर्व रिंग रोडमध्ये बाधित होणाऱ्या काही गावातील जमिनींचे फेर मूल्यांकनाचे काम अद्याप बाकी आहे. मात्र हे देखील काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकन पूर्ण झाले असल्याने आता या पश्चिम रिंग रोडसाठी दर निश्चिती करण्यात येणार आहे.
आता पुढील काही दिवसांत पश्चिम रिंग रोडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याबाबत नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेरमूल्यांकनानुसार प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याचे तक्ते सध्या अद्ययावत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन प्रकल्पग्रस्तांना किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबतची नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत झालेल्या बैठकीत पश्चिम भागाची दरनिश्चितीबाबत चर्चा झाली आहे. आता या बैठकीचे इतिवृत्त अंतिम करून आठ दिवसांत दरनिश्चित केली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी नुकतीच दिली आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….
केव्हा सुरू होणार भूसंपादन?
हाती आलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या शेवटी रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांची किती जमीन संपादित होणार, त्या बदल्यात संबंधितांना किती मोबदला मिळणार, याबाबत सविस्तर अशी नोटीस बजावली जाणार आहे. यानंतर मग मान्यता असल्यास दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. एकंदरीत पुढल्या महिन्यात या प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार अधिक मोबदला
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पामध्ये बाधित होणारे जे शेतकरी स्वतःहून प्रकल्पासाठी जमीन देतील त्यांना अधिकचा मोबदला दिला जाणार आहे. अर्थातच जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या दरांवर जे शेतकरी जमीन देण्यास उत्सुक असतील त्यांना अधिकचा मोबदला मिळणार आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय