River Update:- भारतामधून अनेक मोठमोठ्या आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या नद्या वाहतात आणि बऱ्याच नद्यांची उगमस्थान हे भारतातच आहे. प्रत्येक राज्यातून कुठली ना कुठली मोठी नदी ही वाहत असते. यामध्ये जर आपण भारतातील मध्य प्रदेश या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राज्याच्या विचार केला तर या ठिकाणी भारताच्या ज्या काही पवित्र अशा परंपरा आहेत त्या भूमीचा इतिहास या राज्याशी जोडला गेला आहे.
मध्यप्रदेश राज्य भौगोलिक व सांस्कृतिक दृष्ट्या देखील अनेक वैशिष्ट्यांनी भरलेले असून या सर्वांचा संगम या राज्यांमध्ये बघायला मिळतो. महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेश राज्याला भारताचे हृदय असे देखील म्हटले जाते. या सगळ्या वैशिष्ट्यांशिवाय मध्य प्रदेश राज्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे मध्य प्रदेश ला नद्यांची मातृभूमी देखील म्हटले जाते.
यामागील जर प्रमुख कारण पाहिले तर प्रमुख नद्यांशिवाय लहान आणि मोठ्या अशा एकूण 207 नद्या या राज्यात वाहतात. देशाची पिण्याच्या पाण्याची व शेतीची गरज भागवणाऱ्या महत्त्वपूर्ण नद्या या मध्य प्रदेश राज्यात उगम पावतात. या अनुषंगाने आपण माहितीस्तव मध्यप्रदेश राज्यातील काही महत्त्वाच्या नद्यांची माहिती घेणार आहोत.
मध्यप्रदेश राज्यातील महत्त्वाच्या नद्या
1- नर्मदा नदी– आपल्याला माहित आहेच की नर्मदा नदी ही देशातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी असून या नदीचे नाते कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेशी देखील जोडले गेलेले आहे. नर्मदा नदी ही तीन राज्यांमध्ये वाहते. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा समावेश होतो. देशाचा प्राण म्हटली जाणारी नर्मदा नदी मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक या ठिकाणी उगम पावते व पुढे वाहत जाऊन खंबाताच्या आखातात मिळते. या नदीची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे.
2- बेतवा नदी– ही नदी देखील देशातील आणि मध्य प्रदेश राज्यातील ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यामधील एक नदी असून या नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यातील रायसन जिल्ह्यातील कुमरा या गावातून होतो. हे नदी पुढे उत्तर प्रदेश राज्यामध्ये हमिरपूर येथे यमुना नदीला मिळते. बेतवा नदीची एकूण लांबी 480 किलोमीटर असून त्यापैकी 380 किमी चा प्रवास ती मध्य प्रदेश राज्यातूनच करते. या नदीच्या उपनद्यांमध्ये बिना, केन,धसन,सिंध, डेनवा या नद्यांचा समावेश होतो. बेतवा नदीला मध्यप्रदेश राज्यातील गंगा असे देखील संबोधले जाते.
3- चंबळ नदी– चंबळ नदी ही देशातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी असून ती मध्यप्रदेश राज्यातील महू, इंदोरच्या भडकला धबधब्यात उगम पावते. या नदीची एकूण लांबी 1024 किलोमीटर असून या नदीचे पौराणिक कथा नुसार महत्व पाहिले तर या नदीचे पौराणिक नाव चर्मणावती असे होते. ही नदी सुमारे 965 किलोमीटर इतके अंतर व्यापते आणि इटावा जवळ यमुना नदीला मिळते. मध्यप्रदेश राज्यातून चंबळ नदी 325 किलोमीटरचे अंतर कापते.
4- तापी नदी– भारतातील ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यापैकी तापी नदी ही एक असून मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणाहून ही नदी वाहते. गुजरात राज्यातील सुरत मधील खंबात येथे ताप्तीला मिळते. तापी नदीची एकूण लांबी 724 km असून मध्य प्रदेश राज्यांमध्ये ती 219 किलोमीटर अंतर पार करते. ही नदी देशातील मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधून वाहते. महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील सीमा म्हणून देखील या नदीचे महत्त्व आहे.
5- महि नदी– पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी महिनदी एक असून या नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कर्क उष्णकटिबंध ओलांडणारी एकमेव अशी नदी आहे. मही नदी मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील मिंडा गावातून वाहते व पुढे झाबुवा आणि रतलाम या जिल्ह्यातून राजस्थान मधील खंबातच्या आखातात येते. महू नदीची एकूण लांबी 576 किलोमीटर इतके आहे.