Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवा रक्कम आणि मिळवा दुप्पट व्याज! 200% मिळेल परतावा, वाचा कॅल्क्युलेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana:-  समाजातील अनेक घटकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. जेणेकरून जीवन जगत असताना त्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्यांनी समृद्ध जीवन जगावे हा त्यामागचा उद्देश असतो.

आता मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत विचार केला तर पालकांना सगळ्यात मोठी काळजी ही मुलांची शिक्षणे आणि  त्यांची लग्न इत्यादींचे असते. कारण या दोन्ही गोष्टींवर सगळ्यात जास्त खर्च होत असतो.

त्यामुळे याच अनुषंगाने शासनाने मुलींच्या करिता  सुकन्या समृद्धी योजना आणली असून या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर या योजनेच्या मॅच्युरिटी वर रक्कम ही तीन पट वाढते आणि मिळणारे व्याज देखील गुंतवणुकीच्या दुप्पट असते. महत्वाचे म्हणजे सरकारने या योजनेमध्ये एक एप्रिल पासून आठ टक्के वार्षिक व्याजदर केलेला आहे.

 या योजनेत एकूण परतावा मिळतो 200%

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास मुलीच्या लग्नाचा व शिक्षणाचा खर्च जवळजवळ मिटतो. योजनेमध्ये जर गुंतवणूक केली तर हा गुंतवणूक रकमेवर मॅच्युरिटीच्या तीन पट रक्कम वाढते. महत्वाचे म्हणजे व्याज देखील केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट असते. या योजनेमध्ये वार्षिक व्याजदर हा 8% आहे.

या योजनेचा परिपक्वता कालावधी हा 21 वर्षे असून यामध्ये पालकांना पंधरा वर्षे गुंतवणूक करावी लागते. बाकीचे उरलेले वर्ष व्याज हे चक्रवाढ पद्धतीने मिळते. या योजनेमध्ये जर तुम्हाला मुलींकरिता गुंतवणूक करायची असेल तर एका वर्षाला एक लाख 50 हजार रुपये जास्तीत जास्त जमा करता येऊ शकतात. या योजनेमध्ये 250 रुपयांमध्ये तुम्ही खाते उघडू शकतात.

 एक लाख रुपये गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन

समजा या योजनेमध्ये जर दरवर्षी एक लाख रुपये गुंतवणूक केली तर सुकन्या समृद्धी योजनेवर मिळणारे व्याज 8% प्रति वर्ष इतके मिळते. प्रति वर्ष एक लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर पंधरा वर्षात तुमची गुंतवणूक 15 लाख रुपये इतके होते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 21 वर्षाचा असल्यामुळे 21 वर्षात तुमची एकूण रक्कम 44 लाख 89 हजार 690 रुपये इतके होते.

म्हणजेच तुम्हाला या रकमेवर 29 लाख 89 हजार 690 रुपये इतके व्याज मिळते. याचाच अर्थ तुमच्या एकूण 15 लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 44 लाख 89 हजार 690 रुपये मिळतात. म्हणजेच या आकडेवारीवरून दिसून येते की गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तीन पट रक्कम मिळते व मिळणारे व्याज देखील गुंतवणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट मिळते.

 मुदतीपूर्वी देखील पैसे काढता येतात

मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जर तिच्या लग्नाकरिता पैसे लागत असतील तर परिपक्वता कालावधी अगोदर देखील तुम्हाला जमा रकमेमधून 50% रक्कम काढता येते. तसेच खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी जर खातेदाराचा अचानक मृत्यू किंवा पालकाचा मृत्यू, खातेदाराला जर एखादा गंभीर आजार झाला किंवा खाते सुरू ठेवण्यासाठी असमर्थ असल्यास  अशा परिस्थितीत मुदतीपूर्वी पैसे काढता येतात.

महत्त्वाचे म्हणजे ही एक करमुक्त योजना असून प्राप्तिकर कायद्याचे कलम 80 सी अंतर्गत एक लाख 50 हजार रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीवर करात सूट मिळते. तसेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जो काही परतावा मिळतो तो देखील करमुक्त असतो. त्या पद्धतीने मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी असणारी ही महत्त्वाची योजना  आहे.