संगमनेरच्या बाप-लेकाची कमाल! असा केला जुगाड की एकाच यंत्राने करता येईल कोळपणी आणि फवारणी, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतीच्या आंतरमशागतीच्या कामांकरिता विविध यंत्रांचा वापर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. तसेच फवारणी करता देखील आता विविध फवारणी यंत्र विकसित झाले असल्याकारणाने फवारणीचे काम देखील आता खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात होणे शक्य झाले आहे. परंतु यातली बऱ्याच यंत्रांच्या किंमती पाहिल्या तर त्या खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ती यंत्रे विकत घेणे परवडत नाही.

याच दृष्टिकोनातून मग काही शेतकरी त्यांच्या अनोख्या बुद्धीचा वापर करतात आणि  शेतीतील विविध कामांकरिता उपस्थित यंत्रांचा शोध लावतात. बरेच शेतकरी घरातील टाकाऊ वस्तूंपासून अशी यंत्र तयार करतात. परंतु या यंत्रांचे काम जर पाहिले तर ते शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर असते व या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च आणि कामासाठी लागणारा वेळ या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते.

याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावचे शेतकरी बाप लेकाच्या जोडीने असेच एक जुगाड करून कल्पनाशक्तीच्या जोरावर उपयुक्त असे कोळपण्यासाठी आवश्यक यंत्र बनवले आहे.

 या शेतकरी बापलेकाने बनवले कोळपणी यंत्र

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील  शेतकरी असलेल्या बापलेकाच्या जोडीने स्वतःचा वेल्डिंग व्यवसायाच्या माध्यमातून कल्पनाशक्ती वापरली व त्याला तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे कोळपणी यंत्र विकसित केले आहे. रामनाथ सोनवणे आणि समाधान सोनवणे असे या बापलेकाचे नाव असून त्यांचा छोटेसे वेल्डिंग शॉप असून या वेल्डिंग शॉप मधूनच त्यांनी या यंत्राचा आविष्कार केला आहे.

महत्वाचे म्हणजे हे यंत्र तीस ते पस्तीस हजार रुपयांमध्ये तयार करण्यात आले असून शेतकरी बांधवांकरिता ते खूप फायद्याचे ठरणार आहे. साधारणपणे दोन महिन्याच्या कालावधीत त्यांनी हे अत्याधुनिक कोळपणी यंत्र तयार केले असून शेतकऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

 या यंत्राने कोळपणीसोबत फवारणी देखील करता येईल

या यंत्राच्या साह्याने सोयाबीन, कपाशी आणि मका इत्यादी पिकांची कोळपणी करता येईलच परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये या यंत्रावर फवारणी मशीन देखील बसवण्याची या बापलेकांची योजना असून या यंत्राच्या साह्याने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना फवारणी देखील करता येणे शक्य होणार आहे.

या यंत्राच्या पुढच्या बाजूला पाच एचपीचे इंजन त्यांनी बसवले आहे व इंजिन चालवण्याकरिता ज्याप्रमाणे मोटार सायकलला एक्सीलेटर असते अगदी त्याच पद्धतीची सिस्टीम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.तसेच या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे कोळपणीच नाही तर शेतामध्ये वाफे किंवा सरी पाडण्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.