आता नाही शेतातील गवताचे टेन्शन! हे छोटे यंत्र करेल तुम्हाला मदत, वाचा या यंत्राची किंमत

Ajay Patil
Published:
cutter machine

यांत्रिकीकरण आता कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिकांची लागवड, शेतीची पूर्व मशागत, पिकांची अंतर मशागत आणि काढणीपर्यंतची सगळी कामे आता यंत्रांच्या माध्यमातून केली जातात. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर शेतीचे मजुरांवर असलेले अवलंबित्व आता कमी होताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे हे विविध आकारांमध्ये असून कामाची गरज ओळखून ते विकसित करण्यात आलेले आहेत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर कोळपणी वगैरे साठी लागणारी यंत्रे छोट्या आकाराचे असतात तर काढणी करिता लागणाऱ्या यंत्रांचा आकार हा मोठा असतो. याच अनुषंगाने जर तुम्हाला शेतामधील गवत काढायचे आहेत तर त्याच्यासाठी देखील आता एक छोट्या आकाराचे मशीन विकसित करण्यात आलेले आहे. या छोट्या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही काही मिनिटांमध्ये एका एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील गवताचा नायनाट करू शकतात.

 फार्मियो सुदर्शन कटिंग मशीन

या यंत्राचा वापर शेतातील गवत काढण्यासाठी करण्यात येतो व काही मिनिटांमध्ये एक एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील गवताचा नायनाट हे मशीन करू शकते. या मशीनच्या एक वैशिष्ट्य म्हणजे हे इलेक्ट्रिक मशीन असून हे चालवायला देखील खूप सोपे आहे. जर आपण या यंत्राची रचना पाहिली तर त्याच्या विरुद्ध बाजूला शार्प स्टीलचे ब्लेड असून ते मजबूत आणि गंजणार नाहीत अशा तंत्रज्ञानाने डिझाईन केले आहेत. वजनाने अतिशय हलके असलेले हे मशीन तुम्ही कुठेही अगदी आरामात नेऊ शकतात.

या मशीनमध्ये 8500 आरपीएमची कॉपर वाइंडिंग असलेली इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून  शेतातील झाडे झुडपे तसेच तन आणि गवत कापण्या करीता हे यंत्र खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे. अगदी मुलांच्या खेळण्यासारखे दिसणारे हे मशीन खूप लहान आहे. परंतु मिनिटांमध्ये खूप मोठ्या क्षेत्राचे गवत कापण्याचे काम करू शकते.

गवत कापण्यास नाही तर मातीची मशागत करणे तसेच छोटे-मोठे तन काढणे इत्यादी कामे देखील हे यंत्र करते. शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून याला छोट्या आकाराचे आणि हलके असे टायर देखील देण्यात आलेले आहेत. जर आपण या यंत्राची किंमत पाहिली तर तुम्हाला केवळ हे 1599 पर्यंत मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe