प्रेरणादायी! वाया गेलेल्या पोराने सुरू केला असा बिजनेस की आता करत आहे कोटीत कमाई, वाचा या तरुणाचा खाचखळग्यानी भरलेला प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समाजामध्ये असे बरेच व्यक्ती किंवा तरुण पाहायला मिळतात की त्यांचे वागणे किंवा त्यांचा काही गोष्टी पाहून आपल्याला वाटते की समोरील व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकणार नाही. कारण त्यांचे एकंदरीत समाजामध्ये राहण्याची आणि वागण्याची पद्धत जरा विचित्र असते. त्यामुळे समाजामध्ये बऱ्याचदा अशा व्यक्तींविषयी तिटकारा म्हणा किंवा त्यांच्याविषयी एकंदरीत जी आदराची भावना असते ती देखील राहत नाही.

परंतु बऱ्याचदा असेच तरुण पुढे चालून  अतिशय वेगळ्या पद्धतीने आयुष्यात यशस्वी होतात.त्यामुळे कुणाविषयी चुकीचे ग्रह पकडणे हे देखील योग्य नाही. याच अनुषंगाने आपण हार्दीया या ठिकाणी लहानशा गावांमध्ये जन्मलेल्या आशुतोष ची कहाणी पाहणार आहोत.

जो जन्म झाल्यानंतरच खूपच मस्तीखोर असा मुलगा होता. त्याच्या या मस्तीखोरपणामुळे त्यांच्या कुटुंबाला देखील भरपूर त्रास सहन करावा लागला. परंतु आयुष्याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचा एक स्टार्टअप सुरू केला व आज त्या स्टार्टअपचा व्यवसाय कोट्यावधीमध्ये आहे.

 यशस्वी झालेल्या आशुतोषची कहाणी

आशुतोषचा जन्म हार्दिया या लहानशा गावामध्ये झाला व तो लहान असतानाच अतिशय मस्तीखोर असा मुलगा होता. जर आशुतोषचे फॅमिलीची पार्श्वभूमी पाहिली तर ती अतिशय चांगली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी कधीच नोकरी केली नव्हती. परंतु लहानपणापासून हा मुलगा अतिशय मस्तीखोर असल्यामुळे गावातील अनेक लोक त्यांच्या घरच्यांना टोमणे मारायचे.

या सगळ्या प्रकारामुळे आशुतोषची आई डिप्रेशन अर्थात नैराश्यामध्ये चालली गेली होती. डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर त्यांनी सांगितले की यांना या वातावरणातून पूर्णपणे बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉक्टरांचा हा सल्ला ऐकून आशुतोष चे वडील दिल्लीला शिफ्ट झाले.

त्या ठिकाणी त्यांनी काही काळ वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली व संपूर्ण कुटुंब दिल्लीला बोलवून घेतल. परंतु हा दिल्लीत आल्यानंतर देखील याचा स्वभाव तसाच होता. मनात येईल त्याप्रमाणे वागण्यामुळे अनेकदा त्याच्या घरच्यांना नुकसान भरपाई देखील द्यावी लागत होती.

जेव्हा हे संपूर्ण कुटुंब दिल्लीला शिफ्ट झाले तेव्हा आसाम मधील एका केंद्रीय विद्यालयांमध्ये आशुतोष ला पाठवण्यात आले. कारण त्या ठिकाणी असणारे शुल्क देखील कमी होते व या कालावधीमध्ये त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील बिघडलेली होती.

त्यामुळे आसाममध्ये आशुतोषला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवल्या. त्याला भाषेची समस्या देखील उद्भवल्यामुळे त्याचे मित्र त्याला चिडवायचे किंवा त्यांची खिल्ली उडवायचे. त्या ठिकाणी एक वर्ष त्यांनी कसेतरी काढले व पुन्हा तो दिल्लीत आला. या सगळ्या कालावधीमध्ये मात्र त्याला पैशांची किंमत काय असते हे समजून आले.

 या ठिकाणी आशुतोषने पाहिले श्रीमंत बनण्याचे स्वप्न

असाममधून दिल्लीत परत आल्यानंतर तो आई-वडिलांना नेहमी प्रश्न करायचा की श्रीमंत कसं होता येत. याकरिता त्याला आईवडिलांनी श्रीमंत होण्यासाठी चांगला अभ्यास करणे गरजेचे आहे असा सल्ला दिला व या सल्ल्यानुसार तो शिक्षणात चांगल्या पद्धतीने रमला.

त्याने सातवी मध्ये चांगले गुण मिळवले व त्याला अनेक मित्र या ठिकाणी येऊन भेटले. शिक्षणाचे महत्त्व त्याला कळल्यामुळे दहावीत देखील त्याने चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवले. परंतु या कालावधीमध्ये त्याच्या वडिलांची नोकरी गेली. याच कालावधीमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला एक गिटार घेऊन दिलेले होते व तो त्या माध्यमातून गिटार वाजवायला शिकला होता.

वडिलांची नोकरी गेल्यामुळे उदरनिर्वाह करणे देखील कठीण जाऊ लागले. त्यामुळे आशुतोषने कुटुंबाला या आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्याचा निश्चय केला व तो  गिटार वाजवण्याचे क्लासेस घेऊ लागला. या माध्यमातून त्याला सहा हजार रुपये कमाई होऊ लागली. या प्रकारे त्याने घराचा उदरनिर्वाह देखील केला आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करून चांगला अभ्यास करून 92 टक्के मार्क घेतले. त्यानंतर दिल्ली येथील युनिव्हर्सिटी मध्ये मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.

 यानंतर त्याने स्वतःचे स्टार्टअप केलं सुरू

या सगळ्या प्रवासामध्ये आशुतोष वर अनेक प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा याकरिता नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. याकरिता कॉल सेंटर पासून तर अनेक ठिकाणी नोकरी देखील केल्या. परंतु श्रीमंत होण्याचे जे काही आशुतोषच स्वप्न होतं ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं.

या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्न देखील सुरू होते व या प्रयत्नानंतरच त्याने एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्लेटफॉर्म सुरू केला. त्याचं नाव  IDigitalPreneur असं ठेवण्यात आलं. या सुरू केलेल्या स्टार्टअप च्या माध्यमातून केवळ अकराच महिन्यात त्याची कंपनीने कोट्यावधीची उलाढाल करणे सुरू केले व त्याचे श्रीमंत होण्याचे स्वप्न त्याने सत्यात उतरवले. सध्या आशुतोष याच प्लॅटफॉर्मवर लोकांना त्यांच्या व्यवसायिक आयुष्यामध्ये उपयुक्त ठरतील अशी कौशल्य शिकवतो

व बरेच लोक त्याचे हे कौशल्य शिकून खूप चांगला पैसा देखील कमावण्यास पात्र ठरत आहेत. हे कौशल्य शिकवण्यासाठी तो काही शुल्क आकारतो व हीच त्याची कमाईचे साधन आहे. तसेच त्याने प्रतिहस्त नावाचे एक यूट्यूब चैनल सुरू केले असून या चॅनलच्या माध्यमातून तो आर्थिक शिक्षणासंबंधी म्हणजेच फायनान्शिअल एज्युकेशन संबंधित व्हिडिओ बनवून ते शेअर करतो. या पद्धतीने एक वाया गेलेला पोरगा अशी ज्याची प्रतिमा होती त्याने अथक प्रयत्नातून आणि जिद्दीतून श्रीमंत होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले.