तरुणाने बनवली अनोखी अशी जुगाडू सायकल! चालवण्यासाठी नाही पॅन्डलची आवश्यकता, वाचा या सायकलची वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुठलेही वाहन असो जिथे चारचाकी असो की दुचाकी तिला चालवण्याकरिता ऊर्जेची आवश्यकता असते. त्या प्रकारची रचना वाहनांची केलेली असते व पेट्रोल किंवा डिझेल सारखे इंधनाच्या साह्याने वाहने चालतात. तसेच सायकलचा विचार केला तर अगदी अगोदर पासून सायकल ही पेंडलच्या साह्याने चालते व आता या कालावधीमध्ये काही इलेक्ट्रिक सायकलची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे.

परंतु जर आपण सायकलचा विचार केला तर विना पेंडल किंवा कुठल्याही इलेक्ट्रिक शिवाय सायकल चालू शकते? हे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओचा जर आपण आधार घेतला

तर यामध्ये एका तरुणाने जुगाड करून अशी सायकल बनवली आहे की ते चालवण्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पेंडलची आवश्यकता नसून ऊर्जेची देखील गरज नाही. एवढेच नाही तर तुम्ही अगदी पावसामध्ये देखील ही सायकल चालवली तरी तुम्ही भिजू शकणार नाहीत अशा पद्धतीचा जुगाड करून ही सायकल बनवण्यात आलेली आहे.

 अशा पद्धतीने तयार केली ही सायकल

जर आपण या व्हिडिओचा आधार घेऊन पाहिले तर या तरुणाने ही सायकल तयार करण्यासाठी जुन्या सायकलचा वापर केला असून याकरिता त्या जुन्या सायकलचे दोन भाग केले आणि या दोन भागांमध्ये एक लोखंडी पट्टी लावली आहे. लोखंडी पट्टी लावल्यामुळे या सायकलची लांबी वाढली.

एवढेच नाही तर याच सायकलचे जे काही सीट आहे ते उंचीनुसार वर खाली करता येईल अशा पद्धतीने सिटची रचना करण्यात आलेली आहे व या सायकलवर एक चौकोनी फ्रेम बसवण्यात आलेली आहे. या चौकोनी फ्रेमवर एक छत असून तुम्ही पावसात देखील सायकल चालवली तरी तुम्ही भिजू शकणार नाहीत

अशा पद्धतीचे रचना करण्यात आलेली आहे. परंतु पँडलशिवाय ही सायकल कशी चालणार? हा यामध्ये कळीचा मुद्दा आहे. या व्हिडिओमध्ये जर पाहिले तर तो तरुण सायकलवर बसतो आणि पायाने थोडा सायकल ला धक्का मारला कि ती सायकल आपोआप पुढे जाते.

 पहा हा व्हिडिओ