Top 10 Farming Business:- शेती क्षेत्राचा आता प्रचंड प्रमाणात विकास झाला असून तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी आता विविध प्रकारच्या पिकांची लागवड करू लागले असून शेतीला पूरक ठरतील असे व्यवसाय देखील आता मोठ्या प्रमाणावर भारतात होऊ लागले आहेत. शेतीमध्ये जी काही परंपरागत पिके या अगोदर घेतली जात होती ती आता काळाच्या ओघात मागे पडली असून शेतीमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारची पिके देखील घेतले जात असून अनेक पूरक धंद्यांची जोड देखील आता शेतकरी शेतीला देऊ लागले आहेत.
तसेच अनेक सुशिक्षित तरुण शिक्षण घेऊन आता नोकरीच्या मागे न लागता शेती क्षेत्रामध्ये नशीब आजमावायला म्हणा किंवा स्वतःचे करिअर म्हणून मोठ्या प्रमाणावर येत असून अशा तरुणांकरिता शेती फायद्याची कशी ठरेल? याचा प्रामुख्याने असे तरुण विचार करत आहे. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये शेतीमधील असे दहा टॉप व्यवसाय आहेत की जे शेतीकडे आता करिअरच्या दृष्टीने पाहत आहेत अशा तरुणांसाठी खूप महत्त्वाचे ठरणारे आहेत. अशा भरपूर आर्थिक उत्पन्न देणाऱ्या काही व्यवसायांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
छप्परफाड कमाई देणारे दहा टॉप कृषी व्यवसाय
1- मसाला पिकांची लागवड( स्पाइस फार्मिंग)- मसाला शेतीचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने इलायची लागवड किंवा लवंग लागवड, काळी मिरी, जायफळ लागवड तसेच तेज पत्ता व दालचिनी लागवड इत्यादी अनेक प्रकारच्या मसाला पिकांची लागवड या प्रकारच्या शेतीमध्ये करता येते. मसाल्यांची मागणी कायमच बाजारपेठेत असल्यामुळे मसाला शेती जर व्यवस्थित माहिती घेऊन केली तर नक्कीच शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा मिळणे या माध्यमातून शक्य आहे.
2- मशरूम फार्मिंग– जर भारताचा विचार केला तर आता भारतामध्ये देखील मशरूम फार्मिंग मोठ्या प्रमाणावर केली जात असून मशरूमचे जे काही भारतातील प्रकार आहेत त्यामधील बटन मशरूम या प्रकाराची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि यातील दुसरा प्रकार म्हणजे ऑईस्टर मशरूम असून याची देखील लागवड केली जाते. मशरूम फार्मिंगचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण वर्षांमध्ये तुम्हाला कोणत्याही हंगामात मशरूम लागवड करता येते. पूर्ण भारतामध्ये मशरूम लागवड करता येणे शक्य आहे.
3- सिल्क फार्मिंग( सेरी कल्चर)- रेशीम शेती विषयी आता बऱ्याच शेतकऱ्यांना संपूर्णपणे माहिती झाली आहे. आपल्याला माहित आहेस की रेशीमच्या कपड्यांपासून ते बऱ्याच वस्तू या बाजारात मिळतात. जर या वस्तूंच्या किमती पाहिल्या तर त्या खूप जास्त असतात. परंतु जर मागणीच्या मानाने विचार केला तर रेशीम उत्पादनाच्या प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे. त्यामुळे रेशीमचे दर हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी एक फायदाचा व्यवसाय ठरू शकतो.
4- मधमाशी पालन– मधमाशी पालन हा व्यवसाय देखील जर शेती सोबत केला तर खूप महत्त्वाचा असून या व्यवसायातून नुसते मधाचे उत्पादन मिळते असे नव्हे तर मेणाचे उत्पादन तसेच जेली उत्पादनाकरिता खूप महत्वपूर्ण असा व्यवसाय आहे. तसेच परागकण जमवण्याकरिता देखील या व्यवसायाचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतीसोबत मधमाशी पालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
5- औषधी वनस्पतींची लागवड– सध्या औषधी वनस्पतींची लागवड करून या संबंधीची पिके घेणे म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवण्यासारखे आहे. भारतातील उत्तराखंड तसेच पंजाब राज्यातील काही भागांमध्ये तसेच हिमाचल प्रदेशातील बऱ्याच भागांमध्ये औषधी वनस्पतींची शेती केली जाते.
6- एक्वाकल्चर फार्मिंग– यामध्ये अनेक प्रकारच्या शेतीचा समावेश करता येईल. यामध्ये मत्स्य पालन तसेच खेकडा पालन आणि इतर व्यवसायांचा समावेश होतो. जर भारतातील या व्यवसायाला असणाऱ्या मागणीचा विचार केला तर भारतामध्ये एक्वा कल्चर फार्मिंगशी संबंधित उत्पादनाचा पुरवठा खूप कमी आहे व मागणी खूप जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे वळले तर नक्की शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळू शकतो. तसेच या श्रेणीतील व्यवसायांसाठी सरकारच्या माध्यमातून 50 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील देण्यात येते.
7- फळ आणि फुलेशेती– फळबाग लागवड आणि फुलशेती देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असलेला शेतीचा प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुसते फळबाग लागवड न करता त्यासोबत तुम्ही फुल शेती केली तर तुम्हाला दुहेरी फायदा होऊ शकतो. जर तुम्ही फळबागांमध्ये चांगले अंतर ठेवून तुम्ही फुलशेती केली तर त्याचा खूप मोठा फायदा मिळतो.
अशा पद्धतीने शेती केल्यामुळे फळबागांसाठी आवश्यक असलेली परागीभवनाची क्रिया देखील वाढते. त्यामुळे अशा पद्धतीच्या शेतीमुळे फळांचे उत्पादन तर मिळतेच आणि फुलांचे देखील उत्पादन मिळते. फळबागांसाठी आवश्यक असलेले परागीभवनाची क्रिया व्यवस्थित झाल्यामुळे फळांचे उत्पादन देखील भरघोस मिळते. जर फुले शेतीचा विचार केला तर तुम्ही नुसते झेंडू आणि गुलाबाची जरी लागवड केली तरी याला संपूर्ण वर्षभर बाजारपेठेत मागणी असते.
8- कुक्कुटपालन( पोल्ट्री फार्मिंग)- या प्रकारच्या शेतीमध्ये बदक पालन, कोंबडी पालन, बटेर पालन आणि शहामृग पालन इत्यादी व्यवसाय पोल्ट्री फार्मिंग या कॅटेगरीमध्ये येतात. हा एक खूप महत्वपूर्ण व्यवसाय असून शेतीसोबत हा व्यवसाय केल्याने खूप मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
9- सेंद्रिय शेती( ऑरगॅनिक फार्मिंग )- ऑरगॅनिक फार्मिंग क्षेत्रामध्ये दोन प्रकार असून यामध्ये ऑरगॅनिक लाईव्हस्टोक फार्म आणि सेंद्रिय शेती म्हणजेच ऑरगॅनिक फार्मिंग हे होय. आपल्याला माहित आहेस की कोरोना कालावधीपासून सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे आता सेंद्रिय शेतीला देखील मोठ्या प्रमाणावर डिमांड येऊ लागली आहे.
10- डेअरी फार्मिंग– भारतामध्ये डेअरी उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असून जर भारतातील मागणीचा विचार केला तर ती खूप जास्त आहे. जर दहा लिटर दूध लागत असेल तर उत्पादन फक्त सहा ते सात लिटर एवढेच आहे. भारत हा प्रमुख दूध उत्पादक देश असून भारतामध्ये या व्यवसायाला खूप मोठी संधी आहे.
त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करून खूप मोठा नफा मिळवता येणे शक्य आहे. या व्यवसायामध्ये जर तुम्ही स्वतः दुधाची विक्री केली तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळणे शक्य आहे. डेरी क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्र असून दिवसेंदिवस या व्यवसायाची मागणी ही वाढतीच राहणार असल्यामुळे हा व्यवसाय खूप फायद्याचा आहे.