Vande Bharat Express: मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करायचा आहे का? तर वाचा वेळापत्रक,तिकीट दर आणि एक्सप्रेसचे वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Vande Bharat Express:-   भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेस विविध शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या वंदे भारत एक्सप्रेस चे महत्व अनन्यसाधारण आहे. नुकतीच मुंबई ते गोवा आहे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून या अगोदर मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर आणि त्यासोबतच नागपूर ते बिलासपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात आलेली आहे.

प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि सोयी सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत एक्सप्रेस अतिशय वैशिष्ट्य पूर्ण रीतीने बनवण्यात आलेली आहे व आता स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले होते. या दोन्ही गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक, तिकीट दर आणि रूट कसा आहे हे जाणून घेणार आहोत.

 मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेसचे महत्त्व

मुंबई आणि सोलापूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोलापूर मधील सिद्धेश्वर तसेच जवळ असलेले अक्कलकोट व तुळजापूर, पंढरपूर आणि आळंदी सारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना देखील जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ने केलेले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे  6.35 तासात तुम्हाला मुंबईवरून सोलापूर येता येणार आहे. या वंदे भारत ट्रेनला दादर, कल्याण तसेच पुणे आणि कुर्डूवाडी या स्टेशनवर थांबा देण्यात आलेला आहे.

 मुंबईसोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक

मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 22225 ही सीएसएमटी स्थानकातून 16.05 वाजता सुटेल आणि सोलापूरला 22.40 वाजता पोहोचेल. महत्त्वाचे म्हणजे ही ट्रेन आठवड्यातून बुधवारी बंद असेल. तसेच ट्रेन क्रमांक 22226 ही सोलापूर ते मुंबई मार्गावर थांबणार असून सोलापूरहुन सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी सीएसएमटी ला पोहोचेल. महत्वाचे म्हणजे गुरुवारी ही ट्रेन बंद असेल.

 साधारणपणे या वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर

मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कोच साठी अनुक्रमे तेराशे रुपये आणि 2365 रुपये तिकीट दर लागणार आहे. यामध्ये केटरिंग चा समावेश असणार आहे. जर तुम्हाला केटरिंगची निवड करायचे नसेल तर चेअर कार साठी 1010 आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचकरिता 2015 तिकीट असणार आहे.

तसेच सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चे भाडे चेअर कारकरिता 1150 आणि एक्झिक्यूटिव्ह चेअर कोच करीता 2125 रुपये असणार आहे. यामध्ये केटरिंग शुल्काचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. केटरिंग शिवाय चेअर कारचे तिकीट दर 1010 तर एक्झिक्युटिव्ह चेअर कार साठी 2015 तिकीट असणार आहे.

 या वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

1- विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन असून बुलेट किंवा मेट्रो ट्रेन सारखे हिला इंटिग्रेटेड इंजिन आहे.

2- वंदे भारत ट्रेनमध्ये पूर्णपणे स्वयंचलित दरवाजे आणि एसी कोच ट्रेनमध्ये 16 पूर्णपणे वातानुकूलित चेअर कार कोच आहेत. यामध्ये दोन आसन पर्याय आहेत. ते म्हणजे इकॉनोमी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास हे होय. तसेच यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक्झिक्यूटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्विंग चेअर देण्यात आलेली असून ती 180° अंशापर्यंत चालू शकते.

3- तसेच ट्रेनमध्ये जीपीएस आधारित प्रगत प्रवासी माहिती प्रणाली देखील उपलब्ध असून ज्या द्वारे तुम्हाला आगामी येणारी स्टेशन्स आणि महत्वाची माहिती बद्दल अपडेट केले जाते.

4- तसेच ट्रेनमधील स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बायो व्हॅक्युम टॉयलेटचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला असून हे टॉयलेट भारतीय आणि वेस्टर्न या दोन्ही प्रकारच्या वॉशरूम करिता वापरले जाऊ शकते.

5- प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रेनच्या सर्व 16 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ट्रेन पूर्ण थांबल्यावरच ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे उघडतात.