Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनमध्ये करण्यात आले 25 बदल! पूर्वीपेक्षा दिसते आणखी आकर्षक, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Train :-जलद वाहतूक आणि आरामदायी प्रवास या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. जर आतापर्यंतचा विचार केला तर साधारणपणे 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आले असून गतिमान प्रवासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जर आपण सध्या असलेल्या वंदे भारत ट्रेनचा विचार केला तर तिच्यामध्ये आता सुरक्षा आणि तांत्रिक बाबींना समोर ठेवून काही सुधारणा करण्यात आले असून या नवीन स्वरूपातील गाड्यांचे उत्पादन चेन्नईतील रेल्वे उत्पादन प्रकल्पामध्ये सुरू आहे व लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

चेन्नई येथील प्रकल्पातून 30 प्रकारच्या 3241 डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्टच ठेवण्यात आले असून या प्रकारच्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश करण्यात आला आहे. ही जी नवीन स्वरूपातील वंदे भारत ट्रेन येणार आहे ती शहरांतर्गत असलेल्या जवळच्या अंतरांकरिता वापरण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रवाशांना या ट्रेनमध्ये अगदी सहजपणे चढता आणि उतरता यावे याकरिता तिला समांतरपणे दोन्ही बाजूला उघडणारी दरवाजे असणार आहेत.

 स्लीपर वंदे भारत निर्मितीची आहे नियोजन

आता सध्या ज्या वंदे भारत ट्रेन धावत आहेत त्यामध्ये स्लीपर अर्थात शयनयान सुविधा नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्लीपर सुविधा असलेल्या  गाड्यांची निर्मिती करण्याचे देखील नियोजन सुरू असून या वर्षाच्या शेवटपर्यंत या निर्णयावर शिक्कामोर्तब  होण्याची शक्यता आहे.

 नवीन वंदे भारत ट्रेनमधील महत्त्वाचे बदल

सध्या  देशामध्ये ज्या वंदेभारत ट्रेन धावत आहेत त्या प्रामुख्याने निळे आणि पांढऱ्या रंगाचे आहेत. परंतु आता या ट्रेनच्या रंगात देखील बदल करण्यात आला असून तिचा रंग आता केसरी म्हणजेच भगवा आणि ग्रे अशा स्वरूपाचा असणार आहे. तसेच वंदे भारत ट्रेनमध्ये जो काही चित्ताचा लोगो लावण्यात आला आहे त्याच्यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. सध्या या नवीन स्वरूपातील वंदे भारत ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये होत असून ही ट्रेन आठ डब्यांची असणार आहे.

या ट्रेनमध्ये साधारणपणे 25 प्रकारचे बदल करण्यात आले असून या भगव्या रंगाच्या रेल्वे ट्रेनचा ट्रायल या अगोदर झाला आहे. पुढे लवकरच या रंगातील वंदे भारत ट्रेन आपल्याला धावताना दिसेल अशी अपेक्षा आहे.तसेच आता वंदे भारत ट्रेनमध्ये ज्या काही सीट आहेत त्यापेक्षा या नवीन वंदे भारत ट्रेनमधील सीट अधिक आरामदायी करण्यात आल्या असून ट्रेनमधील वॉश बेसिनची खोली देखील वाढवण्यात आली आहे.

एवढेच नाही तर सिटांचे रिक्लायनिग एंगल देखील वाढवण्यात आले आहेत. तसेच या वंदे भारत ट्रेनचा एक्झिक्यूटिव्ह श्रेणीतील सिटचा रंग हा लाल आणि सोनेरी असून टॉयलेट मधील लाईट देखील आता दीड ऐवजी अडीच वॉटचा करण्यात आला आहे. तसेच कुलिंगसाठी एअर टाईटनेस देखील वाढवण्यात आला असून एफआरपी पॅनलला मॉडिफाइड पॅनल लावण्यात आले आहेत.

यासोबतच खुर्च्यांचे कुशन अधिक चांगले बसवण्यात आले असून मोबाईल चार्जिंगसाठी आधीपेक्षा चांगली सुविधा देण्यात आली आहे. एक्झिक्युटीव्ह चेअर कार मध्ये पाय ठेवण्यासाठी मोकळी आणि मोठी जागा ठेवण्यात आली आहे. तसेच ट्रेनमध्ये चांगल्या प्रकारे वाचन करता यावे यासाठी त्या ठिकाणी प्रवाशांना दिव्याचा वापर सहजपणे करता येईल अशी रचना करण्यात आलेली आहे.