तुमच्या गावात कोणी जमीन विकली आणि कोणी खरेदी केली? वापरा तुमचा मोबाईल आणि पहा संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक गावामध्ये जमिनीचे अनेक व्यवहार होत असतात. काही कारणास्तव शेतकरी बंधूंना जमीन विक्री करावी लागते व ती जमीन खरेदी करणारे देखील गावातील किंवा बाहेरील गावातील कोणी व्यक्ती असते. बऱ्याचदा असे व्यवहार हे गावामध्ये होतात परंतु आपल्याला माहिती पडत नाही. कधी कधी अशा पद्धतीचे व्यवहार हे आपल्या हितसंबंधाची किंवा आपल्या शेताची देखील निगडित असू शकतात. या दृष्टिकोनातून गावांमध्ये झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आपल्याला माहीत असणे देखील तेवढेच गरजेचे आहे आणि गावाच्या दृष्टिकोनातून अपडेट राहणे हे देखील महत्त्वाचे आहे.

बऱ्याचदा काही शेत जमिनींचे व्यवहार अगदी गुपचूप पणे केले जातात व त्याची माहिती बऱ्याच जणांना होत नाही. त्यामुळे आपण अपडेटेड राहावे किंवा आपले काही नुकसान होत आहे का? इत्यादी गोष्टीसाठी असे व्यवहार माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे.  त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील जमीन खरेदी विक्रीची माहिती तुमच्या मोबाईलवर देखील घरी बसून पाहू शकतात. याबद्दलचीच अधिकची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 आपली चावडी पोर्टल करेल तुम्हाला मदत

तुम्हाला जर तुमच्या गावातील असे व्यवहार बघायचे असतील तर तुम्ही आपली चावडी या पोर्टलची मदत घेऊ शकतात. या पोर्टलवर तुम्ही तुमच्या गावातील शेत जमीन खरेदी विक्रीची संपूर्ण माहिती तसेच गावातील चालू फेरफार इत्यादी माहिती तुम्हाला मिळते. या पोर्टल चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीची खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर जेव्हा या व्यवहाराची नोंद होते त्या अगोदरच खरेदी विक्रीची माहिती आपली चावडी ई फेरफार पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते.

त्यामुळे जर कुणाला या व्यवहारामुळे काही अडचण असेल तर आपली चावडी या पोर्टलवर माहिती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला त्या व्यवहारासंबंधी आक्षेप नोंदवता येऊ शकतो. त्यामुळे वेळेआधी आपण सावध होतो व पुढचा वाद जास्त वाढणार नाही याची देखील काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून हे पोर्टल महत्त्वाचे आहे.

 आपली चावडी पोर्टलवर अशा पद्धतीने बघा माहिती

1- याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये आपली चावडी भूमी अभिलेख वेबसाईट ओपन करावी लागेल.

2- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर आपली चावडी पोर्टल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawadi ही साईट ओपन करावी लागेल.

3- ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सातबारा विषयी, मालमत्ता पत्रक विषयी आणि मोजणी विषयी असे तीन पर्याय दिसतात.

4- आपण सातबारा उतारा संबंधित माहिती बघणार आहोत म्हणून आपण सातबारा विषयी हा पर्याय निवडावा.

5- त्यानंतर तुम्ही राहत असलेल्या जिल्हा, तालुका आणि तुमचे गावाची निवड करावी. नंतर तुम्हाला एक कोड देण्यात येईल तो दिलेल्या चौकोनात व्यवस्थित टाकावा व आपली चावडी पहा वर क्लिक करावे.

6- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीच्या संदर्भातील चालू व्यवहार तसेच चालू फेरफार यांचे संपूर्ण माहिती बघायला मिळते.

अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बघू शकतात.