आमदार रोहित पवार अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार ? रोहित पवारांचं एका वाक्यात उत्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Lok Sabha Election :- सध्याची राजकारणाची बदलती समीकरणे जर पहिली तर आगामी लोकसभेला अनेक उलथापालथ दिसण्याची शक्यता आहे.

त्यात आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे अहमदनगर मतदार संघातून लोकसभा लढवणार का अशी चर्चा सुरु आहे. अनेक राजकीय विश्लेषक त्याच्यावर विश्लेषण देखील देताना दिसत आहेत. परंतु हे किती सत्य आहे यावर स्वतः रोहित पवारांनीच स्पष्टीकरण दिल आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी फक्त विधानसभा निवडणूक लढवणार असून कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवणार आहे. ‘मला दिल्लीला जाण्यात स्वारस्य नाही असं ते म्हणालेत.

रोहित पवार माध्यमांशी अहमदनगर याठिकाणी बोलत होते. सध्याची राजकीय स्तिती कशी बदलेल हे सांगता येणे अवघड आहे. त्याचमुळे पत्रकारांनी हा प्रश्न अहमदनगरमध्ये आलेल्या रोहित पवार यांना विचारला.

अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहात का? पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहात का? ‘मला दिल्लीला जायचं नाही. मला महाराष्ट्र विधानसभेत काम करायचे आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, की राजकीय चर्चा होत असतात. विश्लेषण होत राहतील. परंतु सत्य वेगळे असते. कर्जत-जामखेड मतदारसंघातून मला साथ मिळाली आहे. मला जनतेने आशीर्वाद दिलेले आहेत.

त्यामुळे मी कर्जत-जामखेड मतदारसंघातूनच लढेल. संघर्षाच्या काळात मला कुणी साथ दिली असेल तर इथले लोक माझ्या पाठीशी उभे राहिले असे ते म्हणाले.

कर्जत-जामखेड माझं कुटुंब
रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेला मी माझे कुटुंब मानतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी हा विधानसभा मतदारसंघ सोडणार नाही . दिल्लीला जाण्याचा विचारही मनाला शिवणार नाही.

तसेच अहमदनगर लोकसभेला आपली विचारधारा, संघटना, पक्ष आणि इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल त्यालाच बळ द्यावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.