कपड्यांच्या दुनियेतला स्वस्त ब्रँड म्हणजेच झुडिओ ! कपड्यांच्या प्रसिद्ध ब्रँडला देत आहे मजबूत टक्कर, वाचा या ब्रँडची कहानी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत देखील कपड्यांच्या बाबतीत कमालीची क्रेझ आपल्याला दिसून येते. परंतु आजकालच्या तरुणाईचा विचार केला तर कपड्यांच्या बाबतीत खूप सजग असून प्रत्येकच बाबतीत प्रत्येकाकडून ब्रँड शोधले जातात. त्यामुळे कपड्यांच्या बाबतीत देखील तरुणाई चांगल्या पद्धतीचा ब्रँडचेच कपडे विकत घेतात. परंतु जर आपण कपड्यांच्या बाजारपेठेतील विचार केला तर ब्रॅण्डेड कपडे घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणात खिशाला झळ बसण्याची शक्यता असते.

त्यामुळे कमीत कमी किमतीमध्ये उत्तम क्वालिटीचे ब्रँडेड कपडे मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु किंमतही कमी आणि ब्रांडेड आणि चांगल्या क्वालिटी चे कपडे मिळणे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. परंतु 1998 यावर्षी कपड्यांच्या दुनियेमध्ये झुडिओ नावाचा ब्रँड अवतरला व सामान्य माणसांना कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळणे शक्य झाले. हा ब्रँड टाटा या घराण्याची निगडित असून स्वस्तामध्ये भारतीयांना कुठलीही गोष्ट उपलब्ध करून देणे हे टाटा घराण्याचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.

 झुडीयो ब्रँड कसा अवतरला मार्केटमध्ये?

भारतामध्ये साधारणपणे 1998 यावर्षी झुडियो या ब्रँडचे आगमन झाले व सर्वसामान्य लोकांना कमीत कमी किमतीमध्ये ब्रँडेड कपडे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या ब्रँडच्या मध्ये कुठलीही कपडे 999 रुपयाच्या आतच तुम्हाला मिळतात. 1998 मध्ये सुरुवातीला  बेंगलोर या ठिकाणी कमर्शियल स्ट्रीट येथे आठ हजार चौरस फूट परिसरामध्ये पहिले शॉप सुरू केले आणि काही वेळा मध्येच हा ब्रँड नावारूपाला आला. ग्राहकांना बजेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळाल्यानंतर सगळीकडे या ब्रँडची चर्चा झाली.

कपड्यांच्या या ब्रँडने दर्जेदार कपडेच नाही तर विविध रंगाच्या व्हरायटी देखील उपलब्ध करून दिले आहेत. झुडिओ ब्रँडचे कपडेच नाहीतर बाकीचे उत्पादने सुद्धा अगदी कमीत कमी किमतीमध्ये आणि उत्तम कॉलिटी मध्ये मिळतात. अल्पावधीत या ब्रँडने खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध मिळाली व आज या ब्रँडचे नेटवर्थ काही कोटींच्या घरामध्ये आहे. आज या कंपनीचे भारतामध्ये 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये स्टोअर्स असून  येणाऱ्या कालावधीमध्ये कंपनी आणखी विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

झुडिओचा मार्केटमध्ये उतरण्याचा टाइमिंग ठरला महत्त्वाचा

साधारणपणे 2016 मध्ये भारतामध्ये ब्रँडेड कपडे घालण्याची चांगल्या प्रकारे क्रेझ होती व याच कालावधीच्या दरम्यान मध्ये हा ब्रँड मार्केटमध्ये उतरला. सुरुवातीला झुडिओ समोर एक आव्हान होतं ते म्हणजे लोकांना पटवून देणे की इतर ब्रँड पेक्षा हा एक चांगला पर्याय आहे व कमी किमतीत उत्तम कपडे देणारा ब्रँड आहे. यामध्ये या ब्रँडने हे यश संपादन केले व कमीत कमी किमतींमध्ये उत्तम क्वालिटीचे प्रॉडक्ट देण्यावर भर दिला आणि ग्राहक जोडले.

यामध्ये कंपनीने ग्राहकांची जी काही मनस्थिती असते तिचा एक चांगला अभ्यास केला. आपण लोकांचा विचार केला तर एखाद्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याची एक क्रेझ असते. हीच लोकांचे मनस्थिती लक्षात घेऊन झुडिओने शॉप उभारताना ती मॉल सारखी चकाचक आणि प्रशस्त व काचेच्या भिंती असलेली बनवली व मॉलमध्ये दुकान सुरू केले.

या दुकानांमध्ये लोकांना मॉलची फिलिंग आली आणि कपडे आणि इतर वस्तू कमीत कमी किमतींमध्ये आणि दर्जेदार क्वालिटीचे मिळाल्यामुळे लोकांची गर्दी वाढू लागली. या ब्रँडचे स्त्रियांकरिता तसेच पुरुषांसाठी व लहान मुलांकरिता देखील कपडे मिळतात. आजमीतिला बघितले तर 2016 मध्ये सुरू झालेला ब्रँड कमी किंमत, उत्तम क्वालिटी या सगळ्या जोरावर कमीत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला.

 या ब्रँडचे मालक कोण आहेत?

या कंपनीचे चेअरमन नोवेल टाटा असून रतन टाटांचे सावत्र भाऊ असून त्यांनी हा ब्रँड सुरू केला. हा ब्रँड सुरू कसा झाला याचे जर उत्तर शोधले तर टाटा ग्रुपने लॅक्मे या कॉस्मेटिक उत्पादन बनवणाऱ्या स्वतःच्या ब्रँडचे 50% शेअर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीला 1998 ला 200 कोटी रुपयांना विकले व या दोनशे कोटी रुपयांमधूनच त्यांनी ट्रेंड नावाची कंपनी सुरू केली व या ट्रेंड कंपनीच्या अंडरच झुडिओ हा ब्रँड काम करत आहे.