अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अहमदनगर शहरातील व्यापारी वर्गाची वसाहत असणार्‍या स्टेशन रोडवरील सथ्था कॉलेनीत एकाच कुुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने नगर शहरात खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने सथ्था कॉलनीत कंटेनमेंट झोन घोषित करत तेथील रस्ते बंद केले. आता 14 दिवस या भागातील हायक्लास फॅमिली घरातच कोंडली जाणार आहेत.

सथ्था कॉलनी शिस्तीची आणि नियम पाळणारी म्हणून ओळखली जाते. मात्र या कॉलनीत करोनाने कसा प्रवेश केला, याबाबत सर्वच संभ्रमित आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून कुटुंबातील एकही सदस्य घराबाहेर पडलेला नसल्याचे या कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्याने प्रशासनाने डोक्याला हात लावला आहे.

कोणताच संपर्क नसतानाही करोनाची लागण झाल्यामुळे कदाचित भाजी, फळ या द्वारे हा विषाणू बाधितांच्या घरात आला असावा किंवा भाजी खरेदीसाठी कोणी घराबाहेर पडले असल्यास गर्दीत गेल्याने ही लागण झाल्याचा अंदाज आता व्यक्त होत आहे.

दरम्यान सथ्था कॉलनी कंटेनमेंट झोन करण्यात आल्याने कॉलनीत जाणारे रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. आता प्रशासनाच्या परवानगीशिवाय कॉलनीत कोणाला जाता येणार नाही आणि आतील लोकांना बाहेर येता येणार नाही.

12 जूनपर्यंत या कॉलनीचे सर्व रस्ते बंद राहणार आहेत. स्टेशन रस्त्यावरील एकच रस्ता एन्ट्रीसाठी ठेवण्यात आला असून बाकी रस्ते बंद केले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews