Farmer Scheme : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये (Agriculture) आता आधुनिक यंत्रांचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत.

माय-बाप शासन (Government) देखील आपल्या स्तरावर शेतकरी बांधवांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. आधुनिकतेच्या युगात शेतकऱ्यांनी शेतीच्या नवनवीन आधुनिक तंत्राशी जुडले पाहिजे, असं मत कृषी क्षेत्रातील जाणकार देखील नमूद करतात.

विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना (Farmer) आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच अत्याधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर करता यावा यासाठी केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार संयुक्तपणे अनेक योजनांशी शेतकऱ्यांना जोडत आहे.

विशेषत: कृषी यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना माफक दरात कृषी यंत्रावर अनुदानही (Subsidy) दिले जाते, जेणेकरून कमी खर्चात व कमी कष्टातही पिकांचे बंपर उत्पादन घेता येईल. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भाजपाशासित मध्य प्रदेश राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना कृषी यंत्रांचा (agricultural machinery) वापर करता यावा तसेच कृषी यंत्रांची मदत घेत उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने एक महत्वाकांक्षी योजना राबवत आहे. शिवराज सिंग सरकार शेतकऱ्यांना सुमारे 11 कृषी यंत्रांवर आर्थिक अनुदान देत आहे. या योजनेंतर्गत (Farmer Scheme) लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या खरेदीवर 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

या कृषी यंत्रांवर अनुदान दिले जाणार आहे बर 

मध्य प्रदेश शेतकरी कल्याण आणि कृषी विकास विभागाकडून कृषी यंत्रांच्या खरेदीवर 40 ते 50 टक्के अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना या कृषी यंत्रांवर आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

विजयी पंखा (ट्रॅक्टर/मोटर चालवलेला)

स्वयंचलित रीपर/रीपर (ट्रॅक्टर चालवलेले)

पॉवर टिलर – 8 BHP  पेक्षा जास्त

श्रेडर / मल्चर

पॉवर वीडर (2 BHP वर चालणारे इंजिन)

रीपर कम बाईंडर

बेलर

अरे रेक

हॅपी सीडर / सुपर सीडर

वायवीय प्लांटर

पॉवर हॅरो

शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान

जात प्रवर्गानुसार, मध्य प्रदेश राज्य सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल.

या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

त्याचबरोबर एससी-एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्रांच्या किमतीवर 50 टक्क्यांपर्यंत अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.